Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop insurance : प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम तातडीने अदा करा

पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने गावागावात दवंडी द्यावी. तसेच विशेष शिबिर आयोजित करून प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक प्राप्त करून त्यांना रक्कम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी गुरुवारी (ता.१०) दिल्या.

Team Agrowon

चंद्रपूर : पीक नुकसानीची (Crop Damage) रक्कम शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने गावागावात दवंडी द्यावी. तसेच विशेष शिबिर आयोजित करून प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक प्राप्त करून त्यांना रक्कम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी गुरुवारी (ता.१०) दिल्या.

वरोरा व भद्रावती येथील तालुकास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी गौडा यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने व इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी पी. एम. किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रलंबित इ-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे सांगून शासनाच्या १३ विविध महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.वरोरा भद्रावती नगरपालिका यांचे विकासकामांचा आढावा घेताना तेथील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली तसेच घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यात आली. नगरपालिकांनी उत्कृष्ट कामातून राज्यामध्ये तीन क्रमांकांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT