Papaya Rate
Papaya Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Papaya Rate : नंदूरबारमध्ये पपईला नऊ रुपये प्रति किलो दर

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
शहादा, जि. नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) सभागृहात पपई उत्पादक शेतकरी, ( Papaya growing farmers) नंदुरबार जिल्हा फळबागायतदार शेतकरी संघ व पपई खरेदीदार व्यापारी यांच्यात पपई दरासंबंधी बैठक झाली.

त्यात शेतकऱ्यांच्या पपई फळाला जागेवरच किंवा शिवार खरेदीत नऊ रुपये किलो भाव ठरविण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांनी दिली.

या वेळी बैठकीला फळ बागायतदार उत्पादक शेतकरी संस्थेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, जयनगर येथील शेतकरी भगवान पाटील, वरूळ-कानडी येथील शेतकरी अशोक पाटील यांच्यासह अन्य शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये हाजी नाजीम हाजी, फारुख हाजी मुल्ला शेख, राजस्थानी व्यापारी जोगाराम प्रकाशराम व इतर व्यापारी उपस्थित होते.

सध्याच्या परिस्थितीत असलेले पपईचे उत्पादन शेतकऱ्यांना त्यासाठी लागणारा खर्च बघता शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येत होते.

गेल्या महिन्यात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत साडेसात रुपये किलो हा भाव जाहीर करून तोडगा काढला होता; मात्र पुन्हा भाववाढ करण्यात यावी, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये पपईला मिळणाऱ्या भावावरून किरकोळ स्वरूपाची धुसफूस सुरू होती म्हणून तोडगा काढण्यासाठी पुन्हा बैठक बोलण्यात आली होती.

बैठकीत कोणत्याही प्रकारचा वाद न होता सर्वानुमते नऊ रुपये किलो हा दर जाहीर करण्यात आला.

शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपसांत तडजोड करून बैठकीत पपईला नऊ रुपये किलो भाव देऊन चांगला मार्ग काढला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याच्या प्रयत्न केला.

शेतकऱ्यांना लागणारा खर्च व व्यापाऱ्यांना लागणारा खर्च याची सांगड घालून शेतकरी आर्थिक अडचणीत येणार नाहीत याची काळजी घेऊन शेतकऱ्यांचे हित बघता सामूहिक निर्णय घेण्यात आला.
-अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा फळबागायतदार संस्था.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT