Jaggery Rate : गूळ सौद्यात प्रति क्विंटल ३३०० ते ५१०० रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या गूळ सौद्यात गुळास ३३०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
Jaggery Rate
Jaggery RateAgrowon

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत (Kolhapur APMC) पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या गूळ सौद्यात (Jaggery Deal) गुळास ३३०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दर (Jaggery Rate) मिळाला. बाजार समितीतील वडणगे विकास सेवा संस्था मर्या. वडणगे या अडत दुकानात सौदे काढण्यात आले.

Jaggery Rate
Jaggery Production : यंदा गुळाचे उत्पादन वाढणार

बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या हस्ते गुळाचे सौदे काढण्यात आले. पाडव्याच्या दिवशी १९ हजार २८० गूळ रव्याची आवक झाली. यंदा उसाची उपलब्धता चांगली होणार असल्याने गुळाची आवकही वाढण्याची शक्यता आहे.

Jaggery Rate
Jaggery Rate : सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते ४०२८ रुपये दर

बाजार समितीतील सर्वच घटकांनी यंदाचा हंगाम सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले. प्रशासक मंडळाचे सदस्य बाजीराव जाधव, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, के. बी. पाटील आदींसह गूळ उत्पादक व बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गूळ प्रकार दर प्रति क्विंटल

स्पेशल ४५०० ते ५१००

१) ४२०० ते ४४९०

२) ३९५० ते ४१९०

३) ३६०० ते ३९४०

४) ३२०० ते ३५९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com