Akola News  Agrowon
ताज्या बातम्या

Paani Foundation : ‘पानी फाउंडेशन’चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत करार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि पानी फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

Team Agrowon

PDKV Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV Akola) आणि पानी फाउंडेशनमध्ये (Paani Foundation) सामंजस्य करार झाला आहे. आता विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ‘फार्मर कप’मध्ये सहभागी शेतकरी गटांना मार्गदर्शन करणार आहेत.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारावेळी पानी फाउंडेशनचे नामदेव ननावरे, विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, तालुका समन्वयक संघपाल वाहूरवाघ, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने आदी उपस्थित होते.

शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी सामंजस्य कराराबाबत, तर ननावरे यांनी पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेबाबत माहिती दिली. त्यानंतर डॉ. गडाख मागील काळात राहुरी विद्यापीठामध्ये केलेल्या कामांचा आढावा घेतला.

अकोला जिल्ह्यामध्ये पानी फाउंडेशनच्या अकोट व बार्शीटाकळी तालुक्यांत सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी गावातील शेतकरी गटांना सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण विस्तार विभागाचे ‘सीईओ’ डॉ. उमेश चिंचमालातपुरे यांनी सूत्रसंचालन केले. संघपाल वाहूरवाघ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT