CM Eknath Shinde agrowon
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांंचे तात्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Heavy Rainfall : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.

Team Agrowon

Maharashtra News : मागच्या दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे या भागातील शेती पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभाग तसेच मुसळधार पाऊस झालेल्या क्षेत्रातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली.

पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या भागातील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानीचेदेखील पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याठिकाणी ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात आणि आपत्तीकाळात जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मंत्री गिरीष महाजनांनी घेतली दखल

गिरीष महाजन यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या टाकळी, देगलूर तालुक्यातील लखा, वनाळी, सुगाव मुखेड तालुक्यातील एकलारा, टाकळी बु., बेटमोगरा, ऊच्चा माऊली या भागातील शिवाराची पाहणी केली. या भागातील अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने काही गावातील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली असून ही कामे त्वरित पूर्ण करुन विद्युत पुरवठा पुर्ववत केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cold Season : राज्यात थंडीचा कडाका टिकून; पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

LPG Cylinder Prices: घरगुती गॅस सिलिंडर खरंच महाग होईल का?; अनुदानाचं सूत्र बदलण्याचा सरकारचा विचार

Mango Flowering: आंबा पिकाने धरला बहर

Animal Nutrition: पशुआहारातील स्टार्चचे महत्त्व

Agriculture Electricity: खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस

SCROLL FOR NEXT