CM Eknath Shinde News : हे शेतकऱ्यांचे सरकार

Nilwande Dam : ‘निळवंडे’तून पाणी सोडण्याची चाचणी
Eknath shinde
Eknath shindeagrowon
Published on
Updated on

Nagar News : ‘‘सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. गारपीट (Hailstorm), अतिवृष्टी, अवकाळीच्या नुकसानीपोटी दुप्पट मदत, दोन ऐवजी तीन हेक्टर मदत आदी निर्णय घेतला.

सततच्या पावसाने होणारे नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले.

हे शेतकऱ्यांचे सरकार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

अकोले (जि. नगर) तालुक्यातील निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. ३१) झाली.

या वेळी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे सचीव दीपक कपूर आदी उपस्थित होते.

Eknath shinde
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या शेतीला कुलगुरूंची भेट

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘आमचा अजेंडा कायम शेतकरी हिताचा राहिला आहे. सरकार आल्यानंतर सर्व निर्णय शेतकरी कष्टकरी, सामान्य लोकांच्या हिताचे घेतले.

शेतकऱ्यांना नवीन उद्योग करता येतील, यासाठी प्रयत्न करत आहोत. बंद केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे.’’

Eknath shinde
Eknath Shinde : ‘बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे’

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘निळवंडे प्रकल्प माझ्या जन्माच्या आधीचा. आठ कोटींचा प्रकल्प ५ हजार कोटींच्या पुढे गेला. १९९५ मध्ये युतीचे सरकार आल्यावर या प्रकल्पास गती मिळाली. २०१७ मध्ये पहिल्यांदा सुधारित मान्यता मिळाल्याने या कामाला गती मिळाली.

आमच्याच काळात या प्रकल्पाला भरीव निधी मिळाला. ५ हजार १७७ नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. आता नवीन सरकार आल्यावर गोसेखुर्द नंतर निळवंडेला अधिक निधी दिला आहे.

गतिमान सरकार म्हणजे मागील सरकारमधील काळात ३० महिन्यांत १ लाख सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या. आम्ही ६ लाख प्रशासकीय सुधारित मान्यता दिल्या.’’

५३ वर्षांनंतर सुटले पाणी
अकोले तालुक्यात झालेल्या निळवंडे धरणाला ५३ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. ३३ वर्षांपूर्वी कामाला सुरुवात झाली. २०२२ मध्ये काम पूर्ण झाले.

२०२३ मध्ये पाणी सोडण्याची चाचणी झाली. तब्बल ५३ वर्षांनंतर पाणी सोडले गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com