Kolhapur News : जिल्ह्यात गेल्या सप्ताहापासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने ३९ फुटांची इशारा पातळी गाठली आहे. सोमवारी (ता. २४) दुपारी तीनपर्यंत नदीची पातळी ३९.११ इंच झाली. जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. प्रयाग चिखली व आंबेवाडी गावातील लोकांचे स्थलांतर सुरू केले आहे.
राधानगरी धरण ८५ टक्के भरले असून, सध्या १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली असून कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मांडुकली व लोंघे येथे पाणी आल्यामुळे कोकणातील संपर्क तुटला आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोमवारी सकाळपासून कमी-अधिक फरकाने जिल्ह्यातील २४ पैकी १५ राज्य मार्ग आणि १२२ पैकी ५१ प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत.
या सर्व मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावरून जोडणाऱ्या सुमारे ४०० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, या गावांसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कधी मुसळधार, तर कधी अतिवृष्टी सुरूच आहे. ओढे, नाले, ओहोळ, कालवे आणि शेती पाण्याने ओसंडून वाहू लागली आहे. त्यामुळे सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
गगनबावडा तालुक्यातील लोंघे, मांडुकली येथे पाणी आल्यामुळे या मार्गावरील गोवा, पणजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील वाहतूक बंद झाली आहे. याची फोंडा घाटमार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ८० जनावरे आणि १२५ लोकांना स्थलांतरित केले आहे; तर चंदगड येथील बाजारपेठेत पाणी शिरल्याने दहा गाळेधारकांना इतरत्र हलविण्यात आले.
पूर्व भागात जोर कमी
सोमवारी (ता. २४) दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. रविवार (ता. २३) संध्याकाळपासून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी होता. धरण क्षेत्रात मात्र पाऊस सुरूच असल्याने नद्यांचे पाणी वाढतच आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.