Kolhapur Rain : कोल्हापुरात धरणक्षेत्रात धुवाधार वृष्टी सुरूच

Latest Rain Update : हवामान विभागाने शनिवारी (ता. २२) जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Updateagrowon
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात तुफान वृष्टी सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

तर पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण क्षेत्रात रविवारी (ता. २३) संपलेल्या २४ तासांत २१० मिमी पाऊस झाला.

Kolhapur Rain Update
Shivaji University Kolhapur : आता शिवाजी विद्यापीठ देणार हवामानाचा अचूक अंदाज, असा होणार कोल्हापूरला लाभ

हवामान विभागाने शनिवारी (ता. २२) जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पातळी ३७.९ इंच इतकी होतो. नदीची इशारा पातळी ३९ फूट ८ इंच असून, धोका पातळी ४३ फुटांपर्यंत आहे. रविवारी सकाळी ८ च्या सुमारास ‘पंचगंगे’चे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत पोहोचले असून, गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद करण्यात आला.

Kolhapur Rain Update
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला महापुराची धास्ती, पाणी पातळीत झपाट्याने वाढ, प्रशासन सतर्क

सुतार वाडा येथे रात्री व सकाळी नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना अग्निशामक विभागाकडून देण्यात आल्या. दूधगंगा नदीवरील बाचणी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. राधानगरी धरण ७७ टक्के भरले असून १३५० क्युसेकने जलविसर्ग सुरू आहे. २६ जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’चा अंदाज वर्तवल्यामुळे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

१३ प्रमुख जिल्हा मार्ग आणि ६ राज्य मार्ग बंद झाल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६ राज्यमार्ग व १६ जिल्हामार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प समन्वय अधिकाऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com