Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : सिंधुदुर्गात परतीचा पाऊस थांबेना

पावसाने भातपिकांची लोंबी जमिनीवर पडायला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. दरम्यान बुधवारी (ता. १२) देखील जिल्ह्यातील कणकवलीत ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण उडाली.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात परतीचा पाऊस (Rainfall) थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. सतत पडत असलेल्या पावसामुळे भातकापणी (Paddy Harvesting) रखडली आहे. पावसाने भातपिकांची लोंबी जमिनीवर पडायला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.

दरम्यान बुधवारी (ता. १२) देखील जिल्ह्यातील कणकवलीत ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण उडाली. याशिवाय जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात परतीच्या पावसाची झोड सुरूच आहे.

जिल्ह्यात रविवारपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पाऊस सुरू आहे. मंगळवारी वैभववाडीत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. तसेच बुधवारी सायकांळी कणकवली शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शहरात दाणादाण उडाली.

अनेक भागात पाणी साचले होते. याशिवाय जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारनतंर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला. सतत पडत असलेल्या पावसामुळे भातपीक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाताची लोंबी चिखलात रूतल्यानंतर ते पीक वाचविण्याचा कोणताही पर्याय शेतकऱ्यांकडे राहत नाही. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ होवू लागला आहे. शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Pest Control: तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या अळीची कशी ओळखाल?

E-Praman Portal : ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

SCROLL FOR NEXT