Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy farming : इगतपुरीत पावसामुळे भात शेतीच्या कामांना गती

Igatpuri Rain Update : इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

Team Agrowon

Nashik Rain News : पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदाच्या हंगामात पावसाने उशिरा का होईना मात्र जोरदार हजेरी लावली आहे. सुरुवातीला पावसाने खंड दिल्याने भाताची रोपे कोमेजून जाण्याची भीती होती.

मात्र गेल्या सप्ताहात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शिवार पाणीदार झाली आहेत. इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

तालुक्यातील जुलैचे पर्जन्यमान ३६९.४ मिमी इतके आहे. सोमवारी (ता. १०) सकाळी ८ वाजेपर्यंत चालू महिन्यात २९८.३ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. ती टक्केवारी ८०.८ टक्के इतकी आहे.

सर्वत्र पडलेल्या दमदार पावसाने भाताची खाचरे भरली आहेत. त्यामुळे रोपे तयार करून भात शेतीला वेग आला आहे. पूर्व भागात पावसाचा जोर वाढल्याने बळीराजा सुखावला आहे. तर तालुक्यात भात शेतीसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

इगतपुरी तालुक्यात पावसाने दुसऱ्या टप्प्यात चांगलीच मुसंडी मारून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पावसाच्या जोरदार सरी तर मध्येच धुके दाटत असल्याने आल्हाददायक वातावरणाची अनुभूती येत आहे. या वातावरणाचा अनुभव आणि धुक्यात मिसळून जाण्यासाठी पर्यटक दाखल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT