Paddy Cultivation
Paddy Cultivation  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Cultivation : मल्चिंगवर भात लावणीसह ठिबकचा अवलंब

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुका भात उत्पादनात (Paddy Production) आघाडीवर आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी विविध सुधारित वाणांसह पद्धतींचा अवलंब शेतकरी करताना दिसत आहेत. तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील शेतकरी देविदास पोपट देवगिरे यांनी नावीन्यपूर्ण पद्धतीने मल्चिंगवर भात लागवड (Paddy Cultivation On Mulching) करून ठिबक सिंचनाचा (Drip Irrigation) अवलंब केला होता. त्यामध्ये व्यवस्थापनाच्या अंगाने त्यांना काही सकारात्मक परिणाम समोर आले आहेत; मात्र लागवड उशिराने झाल्याने उत्पादन वाढ मात्र साधता आली नाही.

लागवड पद्धतीत बदल करून नावीन्यपूर्ण पद्धतीने बेडवर २५ मायक्रोन जाडीच्या ४ फुटी पॉलीमल्चिंग पेपरवर १७ ऑगस्ट रोजी लागवड करण्यात आली होती. पट्टा पद्धतीने दोन ओळींची लागवड करण्यात आली. त्यातील दोन ओळींतील अंतर ४० सेमी इतके ठेवण्यात आले होते. तसेच रोपांतील अंतर २० सेमी ठेवण्यात आले होते. १६ मिमी बाय जाडीच्या प्रती तास ४ लिटर विसर्ग ठिबक सिंचनासाठी निश्चित करण्यात आला होता. दोन ठिबक नळ्यामधील अंतर ४.५ फूट ठेवण्यात आले होते.

मल्चिंगवर चार फुटी सरीवर दुहेरी पद्धतीने भात लागवड करून त्यांनी उत्पादन घेतल्याने चिखलणीचा खर्च कमी, मर्यादित बियाणे, वाढीनुसार खत व पाण्याचे व्यवस्थापन, कमी तण प्रादुर्भाव व मजुरीची बचत, असे काही उद्देश समोर ठेवून पीक व्यवस्थापन करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी या प्रयोगाची पाहणी केली होती. कृषीविद्या विषय तज्ज्ञ आनंद मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रयोगात समोर आलेले निष्कर्ष

चिखलणी करण्याचा पहिल्या टप्प्यातील खर्च कमी

एकरी ३ किलो बियाण्याचा वापर

पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खत व सिंचन व्यवस्थापन करणे शक्य

लागवड क्षेत्रात तणांचा प्रादुर्भाव तुलनेत कमी

कामकाज करण्यासाठी कमी मनुष्यबळ लागल्याने मजुरी खर्चात बचत

चालू वर्षी लागवड पद्धतीत बदल केला; मात्र उशिरा लागवड झाल्याने उत्पादकता मिळालेली नाही. लागवडीसाठी वापरलेले रोपे उशिराची होते; मात्र काही फायदे समोर आले आहेत.- देविदास देवगिरे, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT