Organic Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : सेंद्रिय शेती आता काळाची गरज

Latest Agriculture News : यावेळी प्रशांत शेटे यांनी मार्गदर्शन करताना सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी उपस्थित शेतकऱ्यांची प्रश्न उत्तर स्वरूपात चर्चा करून सोयाबीन पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

Team Agrowon

Pune News : सेंद्रिय शेती आता काळाची गरज बनली आहे, प्रत्येकाने आपल्या शेतात स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी तरी सेंद्रिय मालाचे उत्पादन घेतले पाहिजे तरच आपले आरोग्य उत्तम राहील असे प्रतिपादन आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ यांनी बुरसेवाडी ( ता. खेड ) येथे केले.

बुरशेवाडी येथे शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना शिबीर व राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी योजना सन 2023-24 अंतर्गत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, वाडा मंडल कृषी अधिकारी भाऊसाहेब मराडे, कृषी पर्यवेक्षक स्वाती दुपारी, आत्माचे प्रकल्प समन्वयक दिनेश सावंत, कृषी सहाय्यक दिगंबर डोलारे, बिबीग्राम सोसायटीचे उपाध्यक्ष कैलास असवले, संचालक साईनाथ चंद्रावळे, हरिभाऊ रोडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्यासाठी वाडा येथील ई सुविधा केंद्राच्या संचालिका सौ स्वाती येवले यांनी शासनाच्या पिक विमा धोरणानुसार एक रुपयांमध्ये पिक विमा काढून देण्याचे कामे केले.

यावेळी प्रशांत शेटे यांनी मार्गदर्शन करताना सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी उपस्थित शेतकऱ्यांची प्रश्न उत्तर स्वरूपात चर्चा करून सोयाबीन पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी बुरशेवाडी येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी व्यवस्थापन योजने अंतर्गत 25 हेक्टरचा सोयाबीन प्रकल्प राबवण्यात आला असून वाडा मंडलांतर्गत शंभर हेक्टर आणि तालुका पातळीवर मोठ्या स्वरूपात सोयाबीनचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न असून सोयाबीनचे क्लस्टर झोन करायचे असून शेतकऱ्यांनी तयारी दाखविल्यास बुरशेवाडी येथे प्रोसेसिंग युनिट उभारण्यात येईल शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

भाऊसाहेब मराडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पिक विमा योजनेविषयी मार्गदर्शन केले. प्रसंगी रामदास इचके, गुलाब रोडे, हरिदास भांगे, सतीश बोरसे, खंडू रोडे, हरिभाऊ रोडे, मधुकर सुपे आनंद घुले यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्तित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साईनाथ चंद्रावळे यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक दिगंबर डोलारे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT