Sugarcane FRP
Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane : शेतकऱ्यांची देणी त्वरित द्या, आर्यन शुगरला आदेश

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरने (Aryan Sugar) शेतकऱ्यांची व ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकांची थकीत रक्कम (Sugarcane Dues) त्वरित द्यावी, असे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी दिले आहेत. तसेच याबाबत तातडीने कार्यवाही करत तसा अहवाल कार्यालयास द्यावा, अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल, असेही या आदेशात म्हटले आहे.

बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर्सकडील थकबाकीपोटी नुकताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिलाव करून विक्रीचा व्यवहार केला आहे. पण हा व्यवहार करताना कारखाना प्रशासनाने शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या देण्याबाबत कोणतीच तजवीज केली नाही. या कारखान्याचे २०१४-१५ या कालावधीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत २२ कोटी ५० लाख इतकी रक्कम थकीत आहे.

तसेच ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकांचे भाडे गेल्या सात वर्षापासून अद्यापपर्यंत मिळाले नसल्याची तक्रार जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केली होती. या तक्रारीवरून प्रादेशिक सहसंचालकांनी हे आदेश दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT