Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : पुणे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईचे आदेश जारी

Team Agrowon

Pune News : पंतप्रधान पीकवीमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स’ विमा कंपनी, मुंबई यांना जारी केले आहेत.

तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील ३-४ आठवड्यांपेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट/वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत), पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड, रोग यांचा प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव) व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर, परिस्थिती ज्यामुळे एकूण पीकपेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणे या प्रातिनिधिक सूचकांच्या (प्रॉक्सी इंडिकेटर) आधारे नुकसान भरपाईबाबत अधिसूचना जारी करण्याची तरतूद आहे.

पावसातील ३-४ आठवड्यांपेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, आणि पर्जन्यातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत) या प्रातिनिधिक सूचकांच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या पिकाचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सदर महसूल मंडळ गटातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम १ महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई अदा केल्यानंतर पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्‍चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

पीक, तालुका आणि सरासरीच्या उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले अधिसूचित महसूल मंडळ व मंडळ गट पुढीलप्रमाणे :

बाजरी

हवेली-कळस, भोसरी, वाघोली, मोशी, खराडी, लोणीकंद, हडपसर, उरुळीकांचन, थेऊर, उरुळीदेवाची, महंमदवाडी, फुरसुंगी, अष्टापूर, लोणीकाळभोर, आंबेगाव तालुका- पारगाव, निरगुडसर, शिरूर तालुका- शिरूर, रांजणगाव गणपती, निमोणे, टाकळीहाजी, मलठण, पाबळ, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, न्हावरा, वडगाव रासाई, इंदापूर तालुका- इंदापूर, लोणीदेवकर, बावडा, पळसदेव, लाखेवाडी, माळवाडी, निमगाव केतकी, काटी, अंथुर्णे, भिगवण, लासुर्णे, सणसर, दौंड तालुका-दौंड, देऊळगाव राजे, रावणगाव, गिरीम, केडगाव, वरवंड, पाटस, बोरीपारधी, यवत, बोरीभडक, खामगाव, राहू, कुरकुंभ, वडगाव बांडे, पुरंदर- सासवड, भिवडी, राजेवाडी, जेजुरी, कुंभारवळण, शिवरी, परिंचे, वाल्हा.

कांदा

पुरंदर तालुका गट, इंदापूर तालुका गट, बारामती तालुका गट, दौंड तालुका गट

सोयाबीन

जुन्नर तालुका- जुन्नर, राजूर, आपटाळे, ओतूर, मढ, वडगाव आनंद, डिंगोरे, नारायणगाव, वेल्हा, निमगाव सावा, वडज, ओझर, आंबेगाव तालुका- घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर, पारगाव, निरगुडसर, खेड तालुका गट, बारामती तालुका गट, इंदापूर तालुका गट

तूर

शिरूर तालुका- शिरूर, रांजणगाव गणपती, टाकळी हाजी, मलठण, निमोणे, पाबळ, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, न्हावरा, वडगाव रासाई, बारामती तालुका- बारामती, उंडवडी क.प., काटेवाडी, माळेगाव, पणदरे, वडगाव निं., शिर्सुफळ, सुपा, लोणी भापकर, मोरगाव, करंजेपूल, इंदापूर तालुका- इंदापूर, लोणीदेवकर, बावडा, सणसर, निमगाव केतकी, काटी, अंथुर्णे, भिगवण, पळसदेव, लाखेवाडी, माळवाडी, लासुर्णे.

भुईमूग

हवेली- खेडशिवापूर, खडकवासला, कोथरूड, चिंचवड, कोंढवा, आंबेगाव बु., धायरी, डोणजे, खानापूर, शिवणे, कोंढवे धावडे, निगडे, देहू, कळस, भोसरी, वाघोली, मोशी, खराडी, लोणीकंद, हडपसर, उरुळीकांचन, थेऊर, उरुळीदेवाची, महंमदवाडी, फुरसुंगी, अष्टापूर, लोणीकाळभोर, खेड तालुका- राजगुरुनगर, कान्हेरसर, वाडा, कुडे बु., करंजविहीरे, कडूस, पाईट, वेताळे, चाकण, पिंपळगाव त. खेड, आळंदी, आंबेगाव तालुका- घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर, पारगाव, निरगुडसर, बारामती तालुका- बारामती, उंडवडी क.प., काटेवाडी, माळेगाव, पणदरे, वडगाव निं., शिर्सुफळ, सुपा, लोणी भापकर, मोरगाव, करंजेपूल, पुरंदर तालुका- सासवड, भिवडी, राजेवाडी, जेजुरी, कुंभारवळण, शिवरी, परिंचे, वाल्हा आणि जुन्नर तालुका गट.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT