Fruit Crop Planting
Fruit Crop Planting Agrowon
ताज्या बातम्या

Fruit Crop Planting : सांगली जिल्ह्यात वाढतेय फळबाग लागवड क्षेत्र

Team Agrowon

सांगली ः जिल्ह्यात अतिवृष्टी,(Heavy rain) परतीचा पाऊस यामुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) होत आहे. त्यामुळे जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवड (Fruit Crop Planting) करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्यात ४७ हजार ४२६ हेक्टरवर फळ बागांचे क्षेत्र होते. २०२१-२२ या वर्षात ४८ हजार २९४ हेक्टरवर लागवड झाली आहे. अर्थात एका वर्षात ८६८ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी पट्ट्यासह इतर तालुक्यांतील शेतकरी आंबा, पेरू, सीताफळ या पिकांबरोबर उतक फळबाग लागवडीसाठी शेतकरी पुढे येत आहेत. जिल्ह्यात चिंच, आवळा, सीताफळ, बोर, पेरू या फळांची लागवडदेखील वाढू लागली आहे.

सीताफळाचे क्षेत्र ४२४ हेक्टर तर, चिंचेचे क्षेत्र ८२ हेक्टर आहे. नारळ १०३ हेक्टरवर नारळीची लागवड झाली आहे. जिल्ह्यात शेतकरी नवे प्रयोग करत आहे. याच नव्या प्रयोगांतून सफरचंदाची लागवड सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हेक्टरवर लागवड झाली असून हे प्रयोग यशस्वी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.

जिल्ह्यात २०१९-२० मध्ये ३९ हजार ७१० हेक्टवर फळबाग लागवड होती. ०२०-२१ मध्ये ४७ हजार ४२६ हेक्टरवर फळांची लागवड झाली आहे. अर्थात १९-२० पेक्षा २०-२१ मध्ये ७ हजार ७१६ हेक्टरने लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचबरोबर गतवर्षी ८६८ हेक्टरने वाढ झाली आहे. वास्तविक, दोन वर्षांपूर्वीपेक्षा गतवर्षी फळबाग लागवडीचा वेग मंदावला असला तरी, शेतकरी बाजारपेठ आणि बाजारपेठेतील मागणी, दर याचा अभ्यास करून लागवडीसाठी पुढे येत असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

सीताफळच्या क्षेत्रात वाढ

जिल्ह्यात सीताफळ लागवड आहेच. परंतु बाजारपेठेत सीताफळाला अपेक्षित दर मिळू लागला आहे. मागणीही चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आटपाडी, जत या दोन तालुक्यांत सीताफळाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. या तालुक्याबरोबर मिरज, तासगाव, खानापूर आणि कवठे महांकाळ तालुक्यांतदेखील सीताफळाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात दिसते आहे.

तालुकानिहाय २०२१-२२ मधील फळबाग लागवड दृष्टीक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज ९६४४

वाळवा १८८०

शिराळा १४९

तासगाव १०१४७

खानापूर ८६१

कडेगाव ४८२

पलूस १८४६

आटपाडी ६६२६

जत ११७९९

कवठे महांकाळ ४८५७

एकूण ४८२९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT