Rain News  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : अठरा दिवसांत अवघे दोनच दिवस तुटपुंजा पाऊस

Team Agrowon

Pune News : यंदा हवामान विभागाने सरासरी ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार जून महिन्याचे जवळपास अठरा दिवस उलटले आहेत. पुणे विभागात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही.

त्यामुळे मागील अठरा दिवसांत अवघे दोनच दिवस हलका पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी खरिपातील पेरण्या रखडल्या असून, खरीप वाया जातो की काय, अशी धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

गेल्या वर्षी विभागात एक ते १५ जून कालावधीत बऱ्यापैकी पाऊस बरसला होता. त्यातच काही ठिकाणी पूर्वमोसमी व मॉन्सूनोत्तर पाऊस झाला होता. त्यामुळे बऱ्यापैकी पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच लगबग सुरू झाली होती.

यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात हुलकावणी दिली होती. त्यातच ५ जून रोजी पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा काहीशी हुलकावणी दिली आहे.

राज्यात लवकरच मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपॉरजॉय या चक्रीवादळामुळे राज्याच्या परिसरात असलेले बाष्प ओढून घेतल्याने आकाश निरभ्र झाले आहे.

आता हवामान विभागातून लवकरच मॉन्सून दाखल होण्याचे संकेत दिले असले प्रत्यक्षात किती कालावधी लागेल हे अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे राज्यात पाऊस कधी बरसेल याची शाश्वती नसल्याने शेतकरीही अडचणीत येत आहे.

विभागातील पावसाची स्थिती

विभागातील सोलापूर जिल्ह्यात गेल्या अठरा दिवसांत अवघ्या दोनच दिवस पाऊस पडला आहे. यात ५ जून आणि ११ जून रोजी अत्यंत तुटपुंजा पाऊस पडल्याने जमिनीत पुरेशी ओलही तयार झालेली नाही. अठरा दिवसांपैकी सहा दिवस पाऊसच पडला नसल्याची नोंद झाली आहे.

सोलापूरमध्ये अवघा ४.४ मिलिमीटर म्हणजेच ४.२ टक्के पाऊस पडला. नगर जिल्ह्यात अवघा १२.२ मिलिमीटर म्हणजेच ११.४ टक्के पाऊस बरसला आहे. जिल्ह्यात अवघ्या दोनच दिवस पाऊस पडला आहे.

यामध्ये पाच जून रोजी ४.२ मिलिमीटर, तर ११ जून रोजी ५.८ मिलिमीटर पाऊस पडला असून इतर दिवशी काही ठिकाणी शिडकावा झाल्याची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातही १२.४ मिलिमीटर म्हणजेच सात टक्के पाऊस पडला आहे. पाच दिवस हा पाऊस तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून सहा दिवस पाऊसच नव्हता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT