Swapnil Shinde
जागतिक तापमान वाढीचा परिणामामुळे मोसमी पावासाच्या आगमानाच्या वेळा आणि कालावधीत सातत्याने बदल होत असल्याने पेरणी हंगामातही बदल जाणवत आहे.
यंदा बिपरजाॅयच्या चक्रीवादळाने समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन नैसर्गिकरित्या तयार होणार्या नैऋत्य मोसमी वार्यावर याचा परिणाम होऊ लागला आहे.
यंदाच नाही तर मागील काही वर्षात 2019, 2020 आणि 2022 या वर्षांत मान्सूनने आपले नेहमीचे वेळापत्रक बदलले आहे.
पूर्वी वैशाख महिन्यात वळवाचा पाऊस कोसळायचा, त्यानंतर ज्येष्ठ महिन्यात पावसाची हजेरी लागल्यानंतर नियमित पाऊस हा मृग नक्षत्रापासून हजेरी लावायचा. सध्या परिस्थितीत चित्र बदललं आहे
सन 2018 मध्ये मोसमी पाऊस 8 जूनला दाखल झाला, दुसर्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये 22 जून, 2020 सालात 12 जून , 2021 मध्ये 9 जून आणि गेल्यावर्षी 2022 मध्ये 16 जून रोजी जाखल झाला.
2023 मध्ये अद्याप मोसमी पाऊस कोकणात सक्रिय झालेला नाही. तर काही भागात त्याने संथगतीने सुरुवात केली आहे.
यंदाही मोसमी पावसाचे आगमन लांबले असल्याने यावर्षी खरिपाचे वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे.