Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : पुणे बाजार समितीत चारच अडत्यांकडून प्रतिज्ञापत्रे

Pune APMC Bogus Adtiya : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांनी आपल्या गाळ्यांवर केवळ दोन मदतनीस आणि एक सहाय्यक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याला अखेर मुहूर्त सापडला आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांनी आपल्या गाळ्यांवर केवळ दोन मदतनीस आणि एक सहाय्यक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याला अखेर मुहूर्त सापडला आहे.

बाजार समितीमधील परवानाधारक सुमारे ७०० अडत्यांपैकी मंगळवारी (ता.२५) केवळ चार अडत्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून बाजार समितीची बोळवण केली आहे. तर अडते असोसिएशनने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ३१ जुलैची मुदत मागितली असल्याचे फळे भाजीपाला विभागप्रमुख महेंद्र काळभोर यांनी सांगितले.

‘बाजार समिती अडत्यांपुढे हतबल’ या दै.‘ॲग्रोवन’च्या सोमवारी (ता.२४) प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर बाजार समिती अडत्यांवर कारवाईसाठी सरसावली होती. मात्र अडते असोसिएशनने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ३१ जुलैची मुदतवाढ मागितल्याने कारवाई थंड झाल्याने केवळ फार्स असल्याचे समोर आले आहे.

पुणे बाजार समितीमधील फळे भाजीपाला विभागातील डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी संचालक मंडळाने काढलेल्या आदेशाला अडत्यांनी केराची टोपली दाखविली आहे. एक महिना होऊन सुद्धा एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने बाजार समिती संचालक मंडळ आणि प्रशासन अडत्यांपुढे हतबल झाले आहे.

त्यामुळे प्रशासनाने अखेर कारवाईचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून (ता.२५) शेतीमाल जप्तीच्या कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले होते. मात्र अजून एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे काळभोर यांनी सांगितले.

तू..तू...मैं...मै...

प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी अडत्यांचा विरोध आहे. तर अडते असोसिएशनचे अध्यक्षच बाजार समितीचे संचालक आहेत. त्यामुळे कोणाची बाजू घ्यावी या कात्रीत ते सापडले आहेत. यामुळे अडते असोसिएशननेच सामूहिक प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आग्रह अडत्यांनी धरला आहे. त्यामुळे असोसिएशन, संचालक आणि अडत्यांमध्ये तू..तू..मैं..मै..सुरू झाली आहे.

सातत्याने स्‍मरण पत्र देऊनही एकाही अडत्याने सोमवार (ता.२४) पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. मात्र मंगळवारी (ता.२५) शेतीमाल जप्तीच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर ४ अडत्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. तर अडते असोसिएशनने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली आहे.
- महेंद्र काळभोर, विभाग प्रमुख, फळे भाजीपाला, बाजार समिती, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT