Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत केवळ १८ टक्के पेरणी

Team Agrowon

Latur News : लातूर विभागातील पाचही जिल्ह्यात खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर असून ४ लाख ८६ हजार ६११ हेक्टर क्षेत्रावर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १८ टक्के प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.

कपाशीच्या एकूण क्षेत्रापैकी ३५ टक्के क्षेत्रावर तर सोयाबीनच्या एकूण क्षेत्रापैकी १७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गत दोन दिवसातील पावसाने पुन्हा एकदा पेरणीने गती पकडली आहे.

लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली नांदेड या पाच जिल्ह्यात मागील सप्ताहात हवामान थंड व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून गुरुवारपर्यंत (ता. ६) १०२.२२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तो ६ जूलै सरासरीच्या ५६ टक्के तर वार्षिक सरासरीच्या १३ टक्के आहे. गत दोन दिवसात झालेल्या पावसानंतर मिळालेल्या उसंतीने गुरुवारी व शुक्रवारी पेरणीने गती पकडली आहे.

जिल्हानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा : लातूर

सर्वसाधारण क्षेत्र : ५ लाख

प्रत्यक्ष पेरणी : १ लाख

टक्केवारी : २१

जिल्हा : धाराशिव

सर्वसाधारण क्षेत्र: ५०७३५

प्रत्यक्ष पेरणी :१८ हजार ५६७

टक्केवारी:३

जिल्हा : नांदेड

सर्वसाधारण क्षेत्र : ७ लाख

प्रत्यक्ष पेरणी : १ लाख ७७ हजार ३९७

टक्केवारी : २२

जिल्हा : परभणी

सर्वसाधारण क्षेत्र : ५ लाख

प्रत्यक्ष पेरणी : १ लाख १७ हजार ७७२

टक्केवारी : २१

जिल्हा : हिंगोली

सर्वसाधारण क्षेत्र : ३ लाख ६१ हजार

प्रत्यक्ष पेरणी : ३८ हजार ७००

टक्केवारी : १०

लातूर विभाग पीक परिस्थिती

खरीप ज्वारी ः सरासरी क्षेत्र ९४ हजार १७८ हेक्टर असून ३०४२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत तीन टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

बाजरी ः सरासरी क्षेत्र ११ हजार ८४२ हेक्टर असून १६९ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ एक टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

मका ः सरासरी क्षेत्र ३० हजार ९६५ हेक्टर असून १ हजार ११० हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

मूग : सरासरी क्षेत्र ९६ हजार ८४१ हेक्टर असून ५०९७ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

उडीद ः सरासरी क्षेत्र ९८ हजार ९२७ हेक्टर असून ४ हजार २५१ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

तूर ः सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर असून ३३ हजार ६५६ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

सोयाबीन ः सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून २ लाख ७१ हजार ०१८ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १७ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

कापूस ः सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर असून १६ लाख ७ हजार ९९७ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३५ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पीक सद्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT