Onion Producing Farmer Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : दुहेरी संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तर कधी?

Maharashtra Onion Farmers : पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली.

Team Agrowon

Onion News : राज्यात नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान मागच्या ६ महिन्यात कांदा उत्पादकांचे अस्मानी संकटामुळे मोठे नुकसान झाल्याने त्यांना अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान रक्कम ठरवली होती.

मात्र ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. दुसरीकडे नाफेड राज्यभर बफर स्टॉक केलेला कांदा विक्रीसाठी आणत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या अनुदानाचे ८५० कोटी रुपये १५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचा निर्णय घेतला होता.

पण प्रत्यक्षात १५ ऑगस्ट उलटल्यानंतर ही अनुदानाचा पत्ता नाही. यामुळे गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ भेटून जाब विचारणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

शेतकऱ्यांना कांदा नुकसानापोटी ३०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याची घोषण अधिवेशनात ९ मार्च रोजी करण्यात आली. त्यानंतर चर्चाअंती या अनुदानात आणखी ५० रुपयांची वाढ सूचवत हे अनुदान ३५० करण्याची घोषणा १३ मार्च रोजी केली.

२७ मार्च रोजी राज्य सरकारने अध्यादेश काढला आणि १५ ऑगस्टच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, असे जाहीर केले.

मात्र एप्रिल ते १५ ऑगस्टपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात फुटकी कवडीही जमा झाली नाही. गुरुवारी सकाळी संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. याचा परिणाम येत्या निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारला येत्या निवडणुकीत दिसून येतील असा सूर आता सुरु झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT