Onion  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Crop Advisory : कांदा उत्पादकांना तत्काळ मिळणार सल्ला

Onion : या दोन्ही संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा उत्पादकांना सुधारित तंत्र, बदलत्या हवामानात होणाऱ्या संभावित नुकसानीचा अंदाज आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

Team Agrowon

Pune News : कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब-आयआयटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील जळगाव सुपे परिसरातील कांदा उत्पादकांसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कीड, रोगांचा प्रादुर्भाव आणि नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मोबाईल संदेश प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

या दोन्ही संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा उत्पादकांना सुधारित तंत्र, बदलत्या हवामानात होणाऱ्या संभावित नुकसानीचा अंदाज आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित ई स्मार्ट ॲग्री स्टेशन मुंबईतील आयआयटी संस्थेतील टीआयएच-आयओटी फाउंडेशनचे विकसित केले आहे.

जळगाव सुपे येथे एका ई स्मार्ट ॲग्री स्टेशनची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गावंडे, वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. राजीव काळे, युवा उद्योजक शिवम गायकवाड, तसेच टीआयएच-आयओटी फाउंडेशनचे हर्ष सावर्डेकर, कौशिक लांडगे, निखिल महादये यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

या प्रकल्पासाठी बारामती येथील ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्र पवार, ‘सीईओ’ प्रा. नीलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे तसेच मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे हे सहकार्य करत आहेत.

टीआयएच-आयओटी फाउंडेशनने विकसित केलेले ई स्मार्ट ॲग्री स्टेशन हवामानातील संभाव्य बदल, कीड, रोगांच्या प्रादुर्भावाचा अंदाज, सिंचन व्यवस्थापनासाठी आवश्यक जमिनीतील ओलावा, तापमान, सामू, खतांचे प्रमाण, सभोवतालचे तापमान आणि आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग, सौर विकिरण आणि पानांची आर्द्रता यांची नोंद ठेवते.

या नोंदीनुसार कांदा व लसूण संशोधन संचालनालनातील तज्ज्ञ मार्गदर्शन पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT