NAFED Onion Procurement : नाफेडमार्फत होणार ३ लाख टन उन्हाळ कांद्याची खरेदी

Onion Market : नाफेड व भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (एनसीसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन लाख टन कांदा खरेदी जाणार आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

Onion Market Update : लेट खरीप कांद्याचे दर पडल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. कांदा उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेनशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुदान देण्याची घोषणा केली होती. यामुळे कांदा उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

त्यातच आता राज्यात उन्हाळी कांदा बाजारात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी १ जूनपासून नाफेडमार्फत उन्हाळी कांदा खरेदी केली जाणार आहे. देवळा तालुक्यातील उमराणे येथील केंद्रावर कांदा खरेदीचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

Onion Market
Onion Subsidy : अनुदानासाठी लाल कांदा नोंदीचा आग्रह धरू नये

नाफेड व भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (एनसीसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन लाख टन कांदा खरेदी जाणार आहे. राज्यात कांद्याच्या पडलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केल्याचे पवार यांनी सांगितले.

Onion Market
Onion Producer : कांदा उत्पादकांचे दुःख जाणून तत्परतेने मदत करा

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून वारंवार कांदा खरेदीबाबतची मागणी केली जात होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १४ फेडरेशन व नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत कांदा खरेदी केली जाणार आहे.

तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यातही कांदा खरेदीला सुरूवात होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

३ लाख टन कांदा खरेदी करणार

नाफेड व एनसीसीएफमार्फत ३ लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढल्यास सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com