Onion Auction Nashik agrowon
ताज्या बातम्या

Onion Auction Nashik : कांद्याचे लिलाव सलग सहा दिवस बंद; शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?

Onion Farmers : तब्बल सहा दिवस झाले तरी कांदा व्यापाऱ्यांचा संप मिटला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

sandeep Shirguppe

Nashik Onion Traders : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने २० सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल सहा दिवस झाले तरी कांदा व्यापाऱ्यांचा संप मिटला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सरकारने तांदुळ, टोमॅटोनंतर आता कांद्यावर निर्यात शुल्क लावल्याने आदीच कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच कांदा व्यापाऱ्यांनी केलेल्या बंद मुळे जवळपास शेतकऱ्यांचे दिडशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी (ता. २२) येवला येथे झालेल्या बैठकीत मागण्यांवर ठाम राहत मागण्या मान्य होईपर्यंत लिलावात सहभागी होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीच्या सुट्टीपासून सहा दिवस कामकाज बंद आहे. परिणामी नऊ लाख क्विंटल आवक तुंबली असून १५० कोटींवर उलाढाल ठप्प झाली आहे. एकीकडे व्यापारी मागण्यांवर ठाम आहेत. तर मंगळवारी (ता. २६) पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत यासंबंधी बैठक होणार आहे.

कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या काय?

कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवणे, नाफेड (NAFED) व एनसीसीएफचा कांदा बंद करणे यासह अन्य मागण्या आहेत. याबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची आज(ता.२५) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी शेतकऱ्यांची भूमिका काय असणार आहे, हे पाहावे लागणार आहे. कारण गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

टोमॅटोनंतर कांद्याचे भाव पाडण्याचा डाव

टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. टोमॅटोनंतर कांद्याचे दर ही सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर देशातंर्गत महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. या निर्यात शुल्काच्या वाढीनंतर कांद्याच्या भावात घसरण होण्यास मदत मिळणार आहे.

बाजारात कांद्यांचे दर 30 ते 40 रुपये किलोच्या घरात आहेत. सरकारकडून काही दिवसांआधीच किंमती पाडण्यासाठी बफर स्टॉक बाजारात आणण्यात आला होता. देशात कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात खराब दर्जाच्या कांद्याचे प्रमाण अधिक असल्याने चांगल्या प्रतीचा कांदा महाग झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT