Cotton Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Crop : कापसाखालील एक लाख हेक्टर क्षेत्र पीकविम्याविना

Crop insurance : कापूस पीक लागवडीत आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत आहे. पाच लाख ५१ हजार हेक्टरपैकी फक्त साडेचार लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रातील कापूस पिकांसाठीच शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : कापूस पीक लागवडीत आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत आहे. पाच लाख ५१ हजार हेक्टरपैकी फक्त साडेचार लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रातील कापूस पिकांसाठीच शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे.  

पीकविमा योजना शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचा लाभ करणारी असल्याचा मुद्दा पुन्हा शेतकऱ्यांच्या अनास्थेमुळे अधोरेखित झाला आहे. राज्यात किंवा देशात सर्वाधिक कापूस लागवड करणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे. मागील हंगामात जिल्ह्यात कापसाची पाच लाख ६७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. जिल्ह्यातील एकूण खरिपाखालील क्षेत्र सात ते सव्वासात लाख हेक्टर एवढे असते. तर एकूण पेरणीयोग्य क्षेत्र सात लाख ६७ हजार हेक्टर एवढे आहे. अर्थात, कापसाखाली मोठे क्षेत्र व्यापते. पण या क्षेत्राला यंदा एक रुपयात विमा संरक्षण घेण्याची संधी असताना शेतकऱ्यांनी त्याबाबत अनास्था दाखविली आहे. एक रुपयात एक हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण देण्याचा निर्णय यंदा अमलात आला. या योजनेत सहभागासंबंधी ३१ जुलै ही अंतिम मुदत होती.

या मुदतीत अनेक शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे योजनेस तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली. पण तरीदेखील कापसाखालील १०० टक्के क्षेत्राला जिल्ह्यात विमा संरक्षण घेण्यात आलेले नाही. यामुळे कृषी यंत्रणा व शासनाचे अपयश यात दिसत आहे. फक्त एक रुपयात पीकविमा याबाबत शेतकऱ्यांमध्ये तक्रारी होत्या. त्यात सीएससीतून अर्ज दाखल करताना एका अर्जासाठी घेतले जाणारे अवाजवी २०० ते २५० रुपये शुल्क, प्रशासनाची उदासीनता आदी तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. पण अखेरपर्यंत सीएससीवर कारवाई कुठेही झाली नाही.

मागील घोळ कायम

पीकविमा योजनेबाबत मागील हंगामातील घोळ कायम आहे. २०२० मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आदी पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. अनेक शेतकऱ्यांना परतावे मिळालेले नाहीत. या बाबत शेतकऱ्यांनी बँका, लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

शासनावर भरवसाच नाही

यापूर्वी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांसाठी निर्देशित पूर्ण शुल्क भरूनही परतावे मिळाले नाहीत. उंबरठा उत्पादन व इतर बाबींमध्ये अनेक मंडळे भरपाईसाठी अपात्र ठरली. यंदा एक रुपयात पीकविमा आहे. पुढे शासन व कंपनी शेतकऱ्यांचे काहीएक ऐकून घेणार नाही. कारण आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपया शुल्क आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT