Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : खरिपात एक लाख चार हजार हेक्टरला फटका

यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून, हंगाम अखेर हे नुकसान तब्बल एक लाख ४ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले.

Team Agrowon

बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टीने (Heavy Rainfall) जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून, हंगाम अखेर हे नुकसान (Crop Damage) तब्बल एक लाख ४ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले. या हंगामात वीज पडून तब्बल १३ जणांचे बळी गेले. सुमारे ७५ जनावरेसुद्धा दगावल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून बदललेल्या निसर्गाचा शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामातही याची पुनरावृत्ती झाली. सातत्याने झालेल्या सुरुवातीच्या काळातील पावसाने तसेच परतीच्या पावसाने तब्बल एक लाख चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. यात सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे.

अतिवृष्टी, पूर, वादळामुळे २०३ कुटुंबाच्या घरांचे नुकसान झाले तर ७५ गुरे दगावली. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के पाऊस नोंद झालेला आहे. खरिपामध्ये सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, नंतरच्या काळात सतत झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पिकांचे मोठे नुकसान झाले

वीज पडून १३ जणांचा बळी

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्यात आतापर्यंत १५ जणांना नैसर्गिक आपत्तीमुळे जीव गमावला आहे. यात १३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला, तर घराची भिंत पडून एकाला प्राण गमवावे लागले. पुरात वाहून दोघांचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तींपैकी २४ जणांच्या कुटुंबांना आतापर्यंत शासकीय मदत देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT