Crop Damage : मराठवाड्यात २५ टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

यंदा ३१० मंडलांत अतिवृष्टी; परतीच्या पावसामुळे नुकसान क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण पेरणी झालेल्या खरीप (Kharip Crop) क्षेत्रापैकी ऑगस्ट अखेरपर्यंतच २५ टक्क्यांपेक्षा जास्त पीक क्षेत्राचे नुकसान (Crop Damage) झाले. त्यात पुन्हा काढणीला आलेल्या पिकांवर २१ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी, सततचा पावसाचे (Heavy Rainfall) आक्रमण झाले. त्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रातही आणखी भर पडणार हे स्पष्ट आहे.

यंदा मराठवाड्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात ४८ लाख ३० हजार ३८५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक २४ लाख ८७ हजार ४८८ हेक्टरवर सोयाबीन, १३ लाख ७१ हजार ४९३ हेक्टरवर कपाशी, तर ९ लाख ७१ हजार ४०३ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी झाली. त्यापैकी १२ लाख ५० हजार ८६१ हेक्टरवरील खरीप पिकांचे ऑगस्ट अखेरपर्यंत अतिवृष्टी, सततचा पाऊस व गोगलगायीच्या आक्रमणामुळे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : दिवाळी साजरी न करता नुकसानीची पाहणी करणार : विखे पाटील

जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या ६ जिल्ह्यांतील १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरवरील पिकांचे जून ते ऑगस्टदरम्यानच्या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. या सोबतच सततच्या पावसाने नांदेड वगळता सात जिल्ह्यांतील ६ लाख ९१ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरला दणका बसला. तर गोगलगायींनी ७२ हजार ४९१ हेक्टरवरील पीक फस्त केले. त्यानंतरही सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अतिवृष्टी, सततचा पाऊस आदींमुळे शेतीपिकाचे नुकसान सुरूच होते. त्यामुळे नुकसानीची टक्केवारी २५ टक्क्यांच्या पुढे जाण्याची स्थिती आहे.

९११ मिलिमीटर पाऊस

मराठवाड्याचे सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मिलिमीटर आहे. २१ ऑक्टोबरअखेरपर्यंत ७२७.८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९११.४ मिलिमीटर पाऊस झाला. २१ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी झालेल्या ३१० मंडलांपैकी १२५ मंडलांत एक वेळ, ८९ मंडलांत दोन वेळा, ६३ मंडलांत तीन वेळा, १९ मंडलांत चार वेळा, ६ मंडलांत पाच वेळा, ६ मंडलांत सहा वेळा व दोन मंडलांत सात वेळ अतिवृष्टी झाली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी क्षेत्र

जालना ६८९८ २३११.७९

परभणी १७५७ ११७९

हिंगोली १४१८१८ ११३६२०

नांदेड ७३६३८९ ५२७४९१

लातूर ५१७७३ २७४२५.३७

उस्मानाबाद. ८०९७७ ६६७२३.२०

सततच्या पावसाने नुकसान (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी क्षेत्र

औरंगाबाद १६४१० १२६७९

जालना ११५० ६७८

परभणी ४४८६ २५४५.२५

हिंगोली १३९८०० ९६६७७

बीड १६० ४८.८०

लातूर ३७४६६० २१३२५१

उस्मानाबाद १५५२५८ ११३७४१

गोगलगायींमुळे नुकसान (हेक्टर)

जिल्हा शेतकरी क्षेत्र

बीड १२९५९ ३८२२.३५

लातूर १०५६३६ ६८३८५

उस्मानाबाद ४०१ २८३.८३

अतिवृष्टी झालेली मंडले

जिल्हा २९ ऑगस्ट अखेर २१ ऑक्टोबर अखेर

औरंगाबाद १५ ३४

जालना १९ ३३

बीड ८ ३९

लातूर २३ ३६

उस्मानाबाद ११ २७

नांदेड ८३ ८४

परभणी २३ ३१

हिंगोली २६ २६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com