Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत जनावरांच्या पशुपालकांसाठी एक कोटीचा निधी

Team Agrowon

सोलापूर ः जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. या आजारामुळे दुग्धव्यवसाय करणारे पशुपालक अडचणीत येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लम्पीमुळे जनावरे मृत पावलेल्या पशुपालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषदेमध्ये सध्या लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांचीच केवळ ही सभा झाली. या सभेत आयत्या वेळेच्या १६ विषयांना मंजुरी देण्यात आली. ‘लम्पी स्कीन’चा सामना करण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी मदत करत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

त्यासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या औषधांची खरेदी, मागासवर्गीय लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरे खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान वाटप करणे, जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त असलेल्या २०२२-२३ या वर्षातील विविध विभागाकडील निधीतून प्रस्तावित कामांवर निधी खर्चास मान्यता, २०२३-२४ या वर्षातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विकास आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या पंढरपूर तालुक्यातील धर्मपुरी, सावंतवाडी आणि मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील नवीन शाळेच्या जागा खरेदी व बांधकाम खर्चासाठी यावेळी मान्यता देण्यात आली. मुळेगाव, कौठाळीत आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी माढा तालुक्यातील वाकाव, दारफळ उपकेंद्राचे रूपांतर आरोग्य केंद्रात तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव आणि पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे उपकेंद्र करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच लघुपाटबंधारे विभागाकडील १ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीतून जलसंधारणाच्या कामाच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

SCROLL FOR NEXT