MSCB Agrowon
ताज्या बातम्या

MSCB : महावितरणकडून २५१ शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘ऑन द स्पॉट’ कोटेशन

गेल्या काही दिवसांत मोहोळ, करमाळा व सांगोला येथील मेळाव्यात ७७३ शेतकऱ्यांनी शेती जोडणीकरिता अर्ज केले. २५१ शेतकऱ्यांना ‘ऑन द स्पॉट’ कोटेशन देण्यात आले.

Team Agrowon

सोलापूर ः शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून, आकडेमुक्त गाव मोहीम राबविण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे व वरिष्ठ अभियंते गावपातळीवर मेळावे घेऊन शेतीचे अर्ज स्वीकारत आहेत. गेल्या काही दिवसांत मोहोळ, करमाळा व सांगोला येथील मेळाव्यात ७७३ शेतकऱ्यांनी शेती जोडणीकरिता अर्ज केले. २५१ शेतकऱ्यांना ‘ऑन द स्पॉट’ कोटेशन देण्यात आले.

शेतीपंपाला अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी रोहित्रावर असलेला अनधिकृत भार कमी होणे आवश्यक आहे; मात्र आकडेबहाद्दरांवर कारवाई करूनही आकडे टाकले जात असल्याचे निदर्शनास आल्याने आकडेबहाद्दरांना नवीन वीजजोडणी घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. बुधवारी (ता. २८) बिटले (ता. मोहोळ) येथील वीज कर्मचाऱ्यांनी वीज उपकेंद्राच्या वधार्पनदिनाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता रमेश राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे तसेच माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांशी बोलताना मुख्य अभियंता पावडे यांनी आकडेमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी आकडे काढून नवीन कनेक्शन घेतल्यास महावितरणकडून चांगल्या सेवेची हमी दिली. तेव्हा अजिंक्यराणा पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात २१३ शेतकऱ्यांचे अर्ज आले. त्यातील १५० कोटेशन तत्काळ देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (ता. २९) सकाळी मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी करमाळा उपविभागात मेळावा घेतला. या ठिकाणी १५९ अर्ज प्राप्त झाले. त्यातील १०१ कोटेशन तातडीने दिली. तर दुपारी सांगोला येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल ४०१ शेतकऱ्यांनी अर्ज आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT