Akola News: अकोला जिल्ह्यात कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्या पदांवर वेळेवर नवीन नियुक्त्या होत नसल्याने विभागाचा कारभार दिवसेंदिवस खिळखिळा होत चालला आहे. आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरही असाच पेच निर्माण झाला असून, पदभार नेमका कोणाकडे द्यायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या पदासाठी पात्र असलेले एकमेव अधिकारी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे हे पदभार स्वीकारण्यास अनुत्सुक असल्याची चर्चा कृषी विभागात सुरू आहे..गेल्या आठवड्यात अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली करण्यात आली असून, ते येथून कार्यमुक्तही झाले आहेत. मात्र त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार कोणाकडे सोपवावा, यासाठी अधिकाऱ्यांची शोधाशोध सुरू आहे. .Agriculture Department: कृषी विभागाला नेमके काय दिले?.सध्या जिल्ह्यात आत्मा प्रकल्प संचालक डॉ. इंगळे यांच्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पात्र अधिकारी उपलब्ध नाही. मात्र डॉ. इंगळे यांनी हा पदभार स्वीकारण्यास वरिष्ठांकडे अनुत्सुकता दर्शविल्याची चर्चा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे यापूर्वीच डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे..Agriculture Department: लेखा परीक्षण अहवाल न दिल्याने ‘एसएओ’ला नोटीस .हे मिशन सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक महत्त्वाची कामे, अहवाल बनविणे सुरू आहेत. त्यातच जैविक मिशन कार्यालयात पुरेसे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने तेथील कारभार डॉ. इंगळे यांनाच सांभाळावा लागत आहे. अशा परिस्थितीत आत्मा प्रकल्प, जैविक मिशन आणि आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार स्वीकारण्याची सूचना विभागीय कृषी सहसंचालकांनी केल्याचे समजते. मात्र एवढ्या जबाबदाऱ्या एकट्याने सांभाळणे शक्य नसल्याने डॉ. इंगळे हे पद स्वीकारण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी कार्यालयाची जबाबदारी नेमकी कोणाकडे द्यायची, हा गंभीर पेच निर्माण झाला आहे..कृषिमंत्री गांभीर्याने लक्ष देतील काय?कृषी क्षेत्रात महत्त्वाचा जिल्हा असलेल्या अकोल्यात पदे रिक्त राहिल्याने विविध योजनांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होत आहे. शेजारच्या वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले कृषिमंत्री अकोल्याकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी अपेक्षा शेतकरी, कृषी क्षेत्रातील घटकांकडून व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.