Sangli News: वाकुर्डे बुद्रुक योजनेतून पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत नियोजन करा. येत्या आठ ते दहा दिवसांत पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देत निकृष्ट काम करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करा, अशी सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी केली..वारणा डावा कालवा उपविभाग वाघवाडी उरुण ईश्वरपूर येथे वाकुर्डे बुद्रुक येथे आवर्तन सोडण्याबाबत व कामाबाबत बैठक जलसंपदा विभाग कार्यालयात पार पडली. त्या वेळी श्री. देशमुख बोलत होते. या वेळी जयराज पाटील, माजी सरपंच जयकर कदम, डी. के. पाटील, सुदाम पाटील, विठ्ठल गडकरी, वारणा डावा कालवा कार्यकारी अभियंता नितीन पोतदार उपस्थित होते. .Wakurde Irrigation Scheme : रेठरे धरण, मानकरवाडी तलावात सोडले वाकुर्डे बुद्रुकचे पाणी .आमदार देशमुख म्हणाले, की वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी आवर्जून सोडण्याबाबतची मागणी शेतकऱ्यांची आहे. पाणी आवर्तन सोडण्याबाबत योग्य नियोजन करा. योजनेमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे योग्य नियोजन झाली पाहिजे. योजनेमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची गळती असलेल्या तक्रारी शेतकऱ्यांच्या वारंवार होत आहेत..Wakurde Irrigation Scheme : वाकुर्डे योजनेचे पाणी सुरू, तरी ‘मोरणे’ची पातळी वाढेना.ती गळती तत्काळ काढण्यात यावी. कार्वे, शेखरवाडी दरम्यानची पाइपलाइन अंदाजपत्रकाप्रमाणे खोली काढण्यात आली नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत. याबाबत तपासणी करून सात दिवसांमध्ये अहवाल तयार करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. त्यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात यावी, अशा सूचना या वेळी आमदार देशमुख यांनी दिल्या. या योजनेच्या कामाबाबत अनेक वर्षांपासून निव्वळ चर्चाच होत आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा आहे. आता लोकांना शाश्वत पाणी देण्याचे नियोजन झाले पाहिजे. .कोणत्याही परिस्थितीत वेळकाढूपणा नको. तसे झाल्यास अधिकाऱ्यांना व संबंधित मक्तेदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शासन मोठ्या प्रमाणात या योजनेच्या कामासाठी निधी देत असताना शेतकरी वर्गाला याचा फायदा होत नसेल तर काय उपयोग, असा सवाल श्री. देशमुख यांनी केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.