Yellow Mozak Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Yellow Mosaic : यवतमाळमध्ये सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव

महागाव, बाभूळगाव, घाटंजी व पांढरकवडा या तालुक्यांत नुकसानीची पातळी अधिक आहे. विशेष म्हणजे एका विशिष्ट वाणावर हा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीजन्य रोगामुळे सोयाबीन उत्पादनात ५० टक्के घट येण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : अतिवृष्टीने (Wet Drought) सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यानंतर आता सोयाबीनवर येलो मोझॅकचा (Soybean Yellow Mosaic Outbreak) प्रादुर्भाव दिसत आहे. महागाव, बाभूळगाव, घाटंजी व पांढरकवडा या तालुक्यांत नुकसानीची पातळी अधिक आहे. विशेष म्हणजे एका विशिष्ट वाणावर हा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीजन्य रोगामुळे सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) ५० टक्के घट येण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यात सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात महागाव, बाभूळगाव, घाटंजी व पांढरकवडा या तालुक्यांत बाधित क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. यापूर्वी सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर आता ‘यलो मोझॅक’ दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून सोयाबीनची पेरणी केली.

उगवलेले सगळे सोयाबीन या प्रादुर्भावामुळे फस्त होण्याची भीती आहे. तज्ज्ञांच्या मते, दूषित बियाण्यांतून पांढऱ्या माशीची उत्पत्ती होते. त्यानंतर हा रोग पसरतो. पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करावा. अनेक शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

गोगलगायीने सोयाबीनचे पीक फस्त केले. त्यानंतर आता हे संकट आले आहे. शेतकऱ्‍यांनी महागडे कीटकनाशके फवारली. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता खर्चदेखील निघेल की नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

पांढरीमाशी नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची ताबडतोब फवारणी शेतकऱ्यांनी करावी. सद्यःस्थितीत महागाव, बाभूळगाव, घाटंजी व पांढरकवडा या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.

- डॉ. प्रमोद यादगीरवार, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT