Chana Rate
Chana Rate Agrowon
ताज्या बातम्या

Chana Procurement : त्रेचाळीस हजारांवर हरभरा उत्पादकांचे ऑफलाइन प्रस्ताव

Team Agrowon

Chana Market Update अमरावती : खरेदी केंद्रावर प्राप्त ४३ हजारांवर ऑफलाईन अर्जाची ऑनलाईन नोंदणी बुधवारपर्यंत (ता. १५) पर्यंत करणे शक्‍य नव्हते. त्याच्याच परिणामी हरभरा खरेदीला (Chana Procurement) मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत होती.

राज्यभरातून या संदर्भाने रेटा वाढल्याने अखेरीस शासनाने हरभरा नोंदणीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारीपासून चण्याच्या ऑनलाइन नोंदणीस सुरुवात करण्यात आली. मात्र त्याच्या एक दिवस अगोदरपासूनच शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांवर नोंदणीसाठी गर्दी केली होती. खरेदीसाठी नियुक्‍त संस्थांना शासनाकडून यूजर आयडी मिळण्यास विलंब झाल्याने ऑनलाइन नोंदणीस विलंब झाला.

यादरम्यान सर्वच केंद्रांवर ऑफलाइन अर्जांचा खच पडला होता. जिल्ह्यातील जिल्हा मार्केटिंग, विदर्भ मार्केटिंग व महाएफपीसीच्या केंद्रांवर तब्बल ४३ हजारांवर ऑफलाइन अर्ज आले होते.

अजूनही अर्ज येत असल्याने त्यांची ऑनलाइन नोंदणी शासनाने दिलेल्या १५ मार्च या अंतिम मुदतीत होणे अशक्‍य असल्याने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कल्पना धोपे यांच्या नेतृत्वात सर्व यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे मुदतवाढीची विनंती केली होती.

अशातच नोंदणीसाठीची मुदत संपायला एक दिवस शिल्लक असताना शासनाने मुदतवाढीचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.

यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसोबतच खरेदीसाठी अभिकर्ता असलेल्या यंत्रणांनाही दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात यावर्षी हरभऱ्याखालील पेरणी क्षेत्रात ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून कृषी विभागाने यावर्षी हरभऱ्याची उत्पादकता सरासरी हेक्‍टरी १५ क्विंटल काढली आहे.

यावर्षी उत्पादन अधिक असले तरी खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी भाव असल्याने शेतकऱ्यांचा ओढा शासकीय केंद्रांकडे असल्याने नोंदणीसाठी गर्दी आहे.

या पार्श्‍वभूमीवर मुदतवाढ आवश्‍यक होती. या निर्णयामुळे निश्‍चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

SCROLL FOR NEXT