Team Agrowon
खानदेशात पांढऱ्या प्रकारातील मोठ्या काबुली हरभऱ्यास नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे.
खानदेशात मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्याला डॉलर किंवा मेक्सिको असेही म्हणतात.
तर लहान आकाराच्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यााला व्ही टू म्हटले जाते. या दोन्ही हरभऱ्यांचे दर यंदा बऱ्यापैकी आहेत.
मोठ्या काबुली हरभऱ्याची पेरणी खानदेशात जळगावमधील रावेर, चोपडा, यावल, जामनेर, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा या भागात केली जाते.
काही भागांत काबुलीची मळणी झाली आहे. तर काही भागांत मळणी अपूर्ण आहे.
मार्चच्या सुरवातीलाच मळणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना सध्या सुरुवातीच्या दरांचा लाभ होत आहे.
जळगाव जिल्ह्यात फक्त अमळनेर व चोपडा या भागांत त्याची आवक अधिक आहे. नंदुरबारमधील नंदुरबार बाजार समितीतही काही प्रमाणात आवक होत आहे.