Animal Feed Agrowon
ताज्या बातम्या

Animal Feed : पशुखाद्याची गुणवत्ता, दरासाठी आता राज्यस्तरीय समिती

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Animal Husbandry Department : राज्यात पशू-पक्ष्यांची खाद्य गुणवत्ता निर्धारित करणे त्यासोबतच त्याचा दरही नियंत्रित राहावा, या उद्देशाने राज्यस्तरीय समिती गठण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ३० जून) या संदर्भाने शासन आदेश काढण्यात आला. समितीचे अध्यक्ष पशुसंवर्धन आयुक्‍त, तर उपसंचालक (वैरण विकास) पशुसंवर्धन आयुक्‍तालय सदस्य सचिव असतील.

सोयाबीन पेंड, मका त्यासोबतच पशुखाद्यात वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांच्या दरावर शासनाचे कोणतेच नियंत्रण नाही. परिणामी, ऐन मागणीच्या काळात यात कृत्रिम तेजी आणत पशुपालकांना वेठीस धरले जात असल्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत.

विशेष म्हणजे पशुखाद्याच्या पोत्यावर त्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश आहे, याचा उल्लेख करण्याचेही उत्पादक कंपन्यांकडून टाळले जात होते. त्यामुळे मनमानी पद्धतीने कंपन्यांकडून पशुखाद्याचे दर आकारले जात असल्याचा संशय पशुपालकांमध्ये आहे. या विषयी पशुपालकांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर अखेरीस या विषयावर स्वतंत्र समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

...यांचा आहे समितीमध्ये समावेश

पशुसंवर्धन आयुक्‍त (अध्यक्ष), उपसंचालक (वैरण विकास) पुणे (सदस्य सचिव), तर सदस्यांमध्ये पशुसंवर्धन अतिरिक्‍त आयुक्‍त, अन्न औषधी प्रशासन सह आयुक्‍त, विभाग प्रमुख पशुपोषण विभाग (पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ), प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी (पुणे), विभागीय संचालक (फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया) मुंबई, विभागीय संचालक भारतीय मानक संस्था (पुणे), उपायुक्‍त पशुसंवर्धन (विषशास्त्र) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग (पुणे),

सहाय्यक आयुक्‍त पशुसंवर्धन (पशुखाद्य विश्‍लेषण प्रयोगशाळा, पुणे), व्यवस्थापक (पशुखाद्य कारखाना) महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ (पुणे), व्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांचे प्रतिनिधी), कंपाउंड लाइव्ह स्टॉक फीड मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनचे प्रतिनिधी,

व्यवस्थापक, पशुखाद्य कारखाना (कोल्हापूर जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ), व्यवस्थापक, पशुखाद्य कारखाना (पुणे जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ), व्यवस्थापक, पशुखाद्य कारखाना (हिंदुस्थान फीड्‍स, सातारा), व्यवस्थापक, पशुखाद्य कारखाना (गोदरेज फीड्‍स, मुंबई), विभागीय व्यवस्थापक, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (मुंबई), वेंकीज इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधी यांचा समितीमध्ये समावेश आहे.

पशुखाद्यात कधीही वाढ होते. परिणामी, छोट्या व्यवसायिकांना याचा फटका बसतो. विशेष म्हणजे पशुखाद्याच्या पाकिटावर त्यातील घटकांची माहिती नोंदविलेली नसते. परिणामी, दर कशावर ठरतात, हे देखील नेहमीच एक गूढ राहिले आहे.
- शुभम महल्ले, संचालक, अमरावती जिल्हा पोल्ट्री व्यावसायिक संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT