Palghar Potato News
Palghar Potato News Agrowon
ताज्या बातम्या

Palghar Potato: आता पालघरचा बटाटाही बाजारात

Team Agrowon

संदीप पंडित, विरार

Palghar News: पालघर जिल्ह्यात आतापर्यंत भातशेती, फुलशेती, तसेच भाजीपाल्याची (Vegetable Cultivation) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्याचबरोबर रब्बी पिकांचे (Rabi Season) मोठे उत्पादन होते; पण आता येथील शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत.

तसाच प्रयोग वाणगाव या समुद्र किनाऱ्याजवळील वसलेल्या गावातील दोन शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रयोग म्हणजे बटाट्याची शेती (Potato Farming)) . आतापर्यंत बटाट्याचे पीक (Potato Crop) सातारा, पुणे या भागात घेतले जात होते; परंतु आता हे पीक पालघरमध्येही घेण्याचा प्रयोग सुरू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व पालघर भागात रब्बी हंगामात बटाटा लागवडीसाठी उत्तम वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे वळण्याचे आवाहन आता कृषी विभागाकडून केले जात आहे.

अशात वाणगाव या समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या भागात राईपाडा येथील दोन शेतकऱ्यांनी १० एकर क्षेत्रावर बटाटा पिकाची लागवड केली आहे.

मोनुसिंग ठाकूर व हितेंद्रसिंग ठाकूर अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांनी मे महिन्यात कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील शास्त्रज्ञ भरत कुशारे यांची भेट घेतली.

यावेळी त्यांना बटाटा लागवड कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतातील मातीचे परीक्षण झाल्यानंतर बटाट्याच्या जातींची निवड करण्यात आली.

मोखाड्यात हिवाळ्यात पालघरमधील इतर तालुक्यांपेक्षा जास्त दिवस थंडी असते. तसेच मातीसुद्धा बटाटा पिकासाठी योग्य आहे.

उत्पादनासह त्यासाठी लागणाऱ्या वेळेची नोंद

सध्या बटाट्याच्या चार जातींची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. आपल्या सागरी किनारा लाभलेल्या तालुक्यात बटाटा किती दिवसांत आणि कसे तयार होते, उत्पादन किती मिळते,

त्याचबरोबर इतर निरीक्षण नोंदणी करण्यात येणार आहे. कुफरी नीलकंठ, कुपरी गंगा, कुफरी लालीमा, कुफरी चिपसोना १ या जातींची लागवड करण्यात आली आहे. कुफरी नीलकंठ या जांभळा बटाट्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून जास्त प्रमाणात उत्पादन देणारी जात आहे.

तसेच कुफरी चिपसोना १ या जातीचा बटाटा चवीला उत्तम असून तो चिप्स बनविण्यासाठी वापरला जातो. या सर्व जाती आपल्या परिसरात कसे उत्पादन देतात याचे निरीक्षण करण्यात येणार आहे.

मोखाड्यातही प्रयोग

मागील वर्षी मोखाडा तालुक्यातील आडोशी या गावामध्ये आरोहण संस्थेच्या मदतीने आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील शास्त्रज्ञ भरत कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी बटाटे लागवड केली होती,

पण मागील वर्षी बियाणे मिळण्यास अडचण आल्याने डिसेंबरअखेर लागवड झाली; परंतु या वर्षी १८ नोव्हेंबरला कोसबाड हिल येथे लागवड करण्यात आली. त्यासाठी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांचे सहकार्य लाभले आहे.

...अशी करा लागवड

बटाटा लागवडीसाठी अंतर ३० बाय २० सेमी गादीवाफा पद्धतीने आणि ६० बाय २० सेमी सरी वरंबा पद्धतीत अंतरावर करावी. साधारणपणे २५ क्विंटल बियाणे प्रतिहेक्टरी लागते.

बटाट्याचे उत्पादन प्रामुख्याने लागवडीसाठीचा हंगाम, जमीन, जात यावर अवलंबून असते. तरी लवकर येणाऱ्या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी २० टन येते. या भागात गादी वाफ्यावर बटाटा अतिशय उत्तम येऊ शकतो, असे कृषी विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील बाजारपेठेत राज्यातील इतर भागांतील बटाटा विक्रीसाठी येतो. मात्र स्थानिक भागात हे पीक घेतल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच त्यातून आर्थिक लाभ मिळेल. तसेच बदलत्या हवामानात आणि बाजारात शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून रब्बी हंगामात जव्हार, मोखाडा व पालघर भागात बटाटा लागवडीसाठी वळावे.
भरत कुशारे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT