E Peek App
E Peek App Agrowon
ताज्या बातम्या

E Peek Pahani : पावणेतीन लाख शेतकऱ्यांची ई-पीक नोंद

टीम ॲग्रोवन

जळगाव : एकविसाव्या शतकात वाटचाल करताना शेतकऱ्यांना आता नवनवीन तंत्रज्ञानाची (Agriculture Technology) ओढ लागली आहे. व्हॉट्सॲप, मोबाईल, यू-ट्यूब, फेसबुकचे युग आहे. शेती करताना नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल याकडे शेतकरी लक्ष देत आहेत. आपल्या पिकांची ई-पीक नोंदणी (E Peek Registration) करण्यात राज्यात जिल्हा अव्वल ठरत आहे. आतापर्यंत पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन ई-पीक नोंदणी केली आहे. तीन लाख ८४ हजार ९८७.२८ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीक नोंद पूर्ण केली आहे.

गेल्या वर्षापासून शासनाच्या महसूल, कृषी विभागातर्फे ‘ई-पीकपाहणी’ प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या वर्षी १ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबरदरम्यान दोन लाख ७६ हजार ६७४ खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली.

यात तीन लाख ८६ हजार ७९४ हेक्टर ३१ आर क्षेत्रापैकी तीन लाख ८४ हजार ९८७ हेक्टर २८ आर सातबारावरील ई-पीक नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात तीन लाख ९१ हजार २६१ हेक्टर ९ आर क्षेत्रापैकी चार हजार ४६६.७८ हेक्टर क्षेत्र कायम पडित म्हणून नोंद आहे. या वर्षी १८०७.०८ हेक्टर क्षेत्राची चालू पडित म्हणून नोंद झाली आहे.

...तर पीककर्ज मिळण्यात अडचणी

जिल्ह्यातील शेतकरी खातेदारांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पीकपाहणी नोंद वेळेत पूर्ण करावी. पीकपाहणी नोंद करण्यात अडचणी असल्यास संबंधित तलाठ्यांची मदत घ्यावी. पीकपाहणी नोंद पूर्ण करू न शकल्यास शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन पडित म्हणून नोंद होईल. आगामी काळात पीककर्ज मिळविण्यात अडचणी येऊ शकतील.

बेमोसमी पाऊस, अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई मिळण्यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासदेखील अडचणी येऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित वेळेत ई-पीकपाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ई-पीक नोंदणी १५ ऑक्टोबरपर्यंत

शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे, सुलभ व्हावे यासाठी मोबाईल ॲपची सुधारित आवृत्ती-२ ई-पीकपाहणी विकसित करण्यात आली आहे. हे सुधारित मोबाईल ॲप १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरीप हंगामातील पीकपाहणी १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पीकपाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना क्रमांक १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT