Agriculture Technology : चारा पीक उद्यानातून तंत्रज्ञान प्रसार
प्रमोदकुमार ताकवले, राहुल काळे
भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली (ICAR News Delhi) प्रायोजित अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन प्रकल्पाची (Fodder Crop Research Project) सुरुवात सन १९७० मध्ये झाली. या केंद्राच्या माध्यमातून चारा पिकांमध्ये सुधारणा व उत्पादनात वाढीवर संशोधन केले जाते. सध्या हा प्रकल्प देशातील २२ समन्वित केंद्रांमध्ये कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत चारा पिकांच्या ३०० पेक्षा जास्त नवीन जाती आणि १०० पेक्षा जास्त उत्पादनविषयक तंत्रज्ञान प्रसारित करण्यात आले आहेत. सन २०२० मध्ये सदर प्रकल्प हा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक संशोधन केंद्रावर चारा पिके उद्यान उभारणी करण्यात आली.
चारा उद्यानाचे महत्त्व ः
१) विविध चारा पिके व त्यांच्या जातींविषयी प्रात्यक्षिके.
२) चारा उत्पादन तसेच पौष्टिक गुणधर्माबाबतची माहिती.
३) विविध हंगामांमध्ये घेतल्या जाणाऱ्या चारा पिकांची ओळख.
...असे आहे चारा उद्यान
१) बाएफ संस्थेच्या उरुळीकांचन केंद्रातील उद्यान हे ०.२० हेक्टर क्षेत्रावर आहे. यामध्ये बहुवार्षिक चारा पिके, खरीप तसेच रब्बी हंगामातील एकदल व द्विदल चारा पिके, तसेच चाऱ्याचे वृक्ष/झुडपे पाहावयास मिळतात.
२) चारा उद्यानामध्ये एकूण ८१ विविध जातींची लागवड करण्यात आली आहे. यांपैकी ३२ जाती या बहुवर्षायू असून, यामध्ये संकरित नेपियर, लुसर्न, मारवेल, गिनी गवत, दशरथ चारा वृक्ष/झुडपे आणि इतर गवतांचा समावेश आहे.
३) खरीप हंगामामध्ये चाऱ्याची चवळी, राइस बीन, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे ४९ जाती, तसेच रब्बी हंगामामध्ये ओट, बरसीम इत्यादी पिकांच्या ५० जातींचा समावेश आहे.
४) चांगल्या प्रतीचा चारा निर्माण झाल्याने दूध उत्पादनात भर पडते. या केंद्रातून शेतकऱ्यांना संकरित नेपियर, गिनी गवत, मारवेल, मका, बाजरी, चवळी, ओट, लुसर्न तसेच बरसीम इत्यादी चारा पिकांचे बेणे व बियाणे यांची उपलब्धता करून दिली जाते.
चारा उद्यानातील विविध पिके आणि त्यांच्या जाती
अ) खरीप हंगामातील पिके आणि जाती
चारा पिके --- जाती
चवळी ---बीएल-१, बीएल-२, बीएल-४, कोहिनूर, यूपीसी-५२८७, यूपीसी-५२८६, यूपीसी-८७०५, यूपीसी-६२१, यूपीसी-६२२, यूपीसी-९२०२, यूपीसी-६१८, यूपीसी-४२००, यूपीसी-२८७, यूपीसी-६०७, यूपीसी-६२८, यूपीसी-६२५, श्वेता, एमएफसी-०९-०१, टीएनएफसी-०९२६, सीएल- ३६७
बाजरी ---बाएफ बाजरा-१, बाएफ बाजरा-५, बाएफ बाजरा-६, एनडीएफबी-३, एपीफबी-९-१, पीसीबी-१६५, जायंट बाजरी, टीएसएफबी-१५-४, टीएसएफबी-१५-८, जीएफबी-४, आरआरबी-१, एफबी-३, टीएसएफबी-१६-१०, एफबीसी-१६, एनडीएफबी-२
ज्वारी ---सीओएफएस-२९, सीओएफएस-३१, एससीएल-२, एसएल-४५
मका ---आफ्रिकन टॉल, केडीएफएम-१, जे-१००७, जे-१००६, सीओएचएम-८
राइस बीन ---बिधान-१, बिधान-२, बिधान-३, शामालीमा
ब) रब्बी हंगामातील चारा पिके ः
लुसर्न ---बाएफ लुसर्न-४, आरएल-८८, एलएलसी-५, आनंद-२
ओट---एचएफओ-११४, एचएफओ-४२७, एचएफओ-५२९, एचएफओ-६०७, एचएफओ-६११, एचजे-८, जेएचओ-२०००-४, जेएचओ-२००९-१,जेएचओ-२०१०-१, जेएचओ-२०१२-२, जेएचओ-२०१५-१, जेएचओ-८२२, जेएचओ-८५१, जेएचओ-९९-१, जेएचओ-९९-२, केंट, एनडीओ-१, एनडीओ-१०, एनडीओ-११०१, एनडीओ-२, एनडीओ-७११, ओएल-१०, ओएल-११, ओएल-१२, ओएल-१३, ओएल-१४, ओएल-१५, ओएल-१७६९, ओएल-१७६९-१, ओएल-१८०२, ओएल-१८०४, ओएल-१८७४, ओएल-१८७४-१, ओएल-१८७६, ओएल-१८७६-२, ओएल-१८९६, एसकेओ-९६, एसकेओ-९०, एसकेओ-२२५, एसकेओ-२०, एसकेओ-१०८, आरो-१९, पीएलपी-१, ओएस-४२४, ओएस-४०५, ओएस-४०३, ओएस-६
बरसीम --- वरदान, बीबी-२, बीबी-३, बीएल-१०, बीएल-१८०, बीएल-२२, बीएल-४२, बीएल-४३, बीएल-४४, एचबी-१, एचबी-२, जेबीएसी-१, जेएचबी-१७-१, जेएचबी-१७-२, जेएचबी-१८-४
क) बहुवर्षायू चारा पिके/वृक्ष/गवते ः
संकरित नेपियर ---बाएफ संकरित नेपियर-१० (बीएनएच-१०), बाएफ संकरित नेपियर-११ (बीएनएच-११), बाएफ संकरित नेपियर-१४ (बीएनएच-१४), सीओबिएन-५, जयवंत.
मारवेल---मारवेल-४०, गोवर्धन
गिनी गवत---मुंबासा, सीओ-४
दशरथ ---वेलीमसल, टीएसएचल-१
चारा वृक्ष/झुडपे ---शेवरी, हादगा, सुबाभूळ, तुती, काटेविरहित निवडुंग
संपर्क : राहुल काळे, ७०२०११६४९४
(बाएफ मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळीकांचन, जि. पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.