Organic Farming Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : भारतीय सेंद्रिय शेती पद्धतीची नेपाळच्या शेतकऱ्यांना भुरळ

नेपाळमधील काही शेतकरी पाच वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्या वेळी स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कृषीशास्त्र विभागाचे प्रमुख आबासाहेब मोरे यांची भेट घेऊन सेंद्रिय शेती पद्धती स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला.

Team Agrowon

Nashik Organic Farming News : जिल्ह्यात काही शेतकऱ्यांकडून रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यातून शेतीमाल उत्पादनासह विपणन ही कामे यशस्वीरीत्या होत आहेत.

हे कामकाज अभ्यासण्यासाठी नेपाळमधील काठमांडू परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या गटाने नाशिक जिल्ह्यात भेटी देत श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांशी संवाद साधत पद्धती समजून घेतल्या.

यानिमित्ताने नेपाळच्या शेतकऱ्यांनाही भारतीय सेंद्रिय शेती पद्धतीची भुरळ पडत असल्याचे समोर आले आहे.

नेपाळमधील काही शेतकरी पाच वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्या वेळी स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कृषीशास्त्र विभागाचे प्रमुख आबासाहेब मोरे यांची भेट घेऊन सेंद्रिय शेती पद्धती स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला.

या भेटीत त्यांना सेंद्रिय शेती संबंधित प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यातूनच नेपाळमधील शेतकऱ्यांचा सातत्याने संवाद वाढत गेला आहे. आजवर १०० हून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्याचे आबासाहेब मोरे यांनी सांगितले.

श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, गुरूपीठ आणि श्रीस्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सेंद्रिय शेती, भरडधान्य प्रसारावर भर देण्यात येत आहे.

या वेळी विविध तृणधान्यांची माहिती नेपाळच्या शेतकऱ्यांनी घेत सेंद्रिय शेतीचा प्रयोग आपल्या देशात करण्याचा संकल्प केला. चिनी तंत्रज्ञानावर नव्हे, तर भारतीय पारंपरिक पद्धतीची शेती आणि सेंद्रीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आपली भूमिका मांडली.

दिंडोरी प्रणित सेवामार्ग येथे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिशास्त्र विभाग कार्यरत असून गेल्या ६ दशकांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले जात आहेत.

हाच विचार घेऊन शेतकऱ्यांचे संघटन उभे करून सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन घेण्यासह प्रोत्साहन दिले जात आहे. याच धर्तीवर नेपाळमध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांचे कामकाज, संघटन उभे केले जात आहे. याच धर्तीवर नेपाळमध्ये कामकाज करणार असल्याचे शेतकऱ्यांनी भेटीदरम्यान सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay: मॉन्सूनच्या विलंबाने खरीप हंगामाला फटका

SMART Rooftop Solar Scheme: अवघ्या २५०० रुपयांत सौर प्रकल्प

Kharif Sowing: मराठवाड्यात खरीप पेरणी अद्याप रखडलेलीच

Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज

Crop Insurance Compensation: पीकविम्याची रक्कम दहा दिवसांत द्या; अन्यथा सरण आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

SCROLL FOR NEXT