Organic Farming : सेंद्रिय शेती पद्धतीतील महत्त्वाची तत्त्वे

आधीच्या भागामध्ये आपण मातीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय खतांच्या वापराची माहिती घेतली.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

या आधीच्या भागामध्ये आपण मातीच्या (Soil Fertility) सुपीकतेसाठी सेंद्रिय खतांच्या (Organic Fertilizer) वापराची माहिती घेतली. या लेखामध्ये पीक नियोजनामध्ये (Crop Management) बीजप्रक्रियेपासून पीक (Seed) संरक्षणापर्यंतच्या बाबी सेंद्रिय किंवा जैविक पद्धतीने कशा हाताळता येतील, याची माहिती घेऊ.

सेंद्रिय शेतीतील पद्धतीती विविध घटक

१) जिवामृत -

२) बीजामृत - बियाणे प्रक्रियेसाठी - पिकाचे किडी व रोगांपासून प्राथमिक अवस्थेत रक्षण करण्यासाठी.

३) सप्तधान्यांकुर अर्क

४) व्हर्मिवॉश - सर्व प्रकारच्या पिकांसाठी महत्त्वपूर्ण अन्नद्रव्ये,अमिनो ॲसिड, ऑक्झिन्स, जिबरेलिन्स, एन्झाइम्सची पूर्तता करण्यासाठी. बीजप्रक्रियेसाठी.

५) व्हर्मिबेड वॉश - सर्व प्रकारच्या पिकांसाठी महत्त्वपूर्ण अन्नद्रव्ये, अमिनो ॲसिड, ऑक्झिन्स, जिबरेलिन्स, एन्झाइम्सची पूर्तता करण्यासाठी. २०-३० लिटर व्हर्मिबेड, वॉश प्रति १७० ते १८० लिटर पाण्यात प्रति एकर पिकावर अथवा जमिनीवर फवारणीसाठी.

६) निंबोळी अर्क - सर्व प्रकारच्या लहान अळ्या, खोड पोखरणाऱ्या अळ्या, भुंगेरे, ढेकूण, मावा इत्यादींच्या व्यवस्थापनासाठी. ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात पिकावर फवारणीसाठी

७) निळे चिकट सापळे - पंखवर्गीय रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी. ४-६ निळे चिकट सापळे प्रति एकर.

८) पिवळे चिकट सापळे - पांढऱ्या माशीच्या व इतर पंखवर्गीय किडी च्या व्यवस्थापनासाठी. ४-६ पिवळे चिकट सापळे प्रति एकर.

वेस्ट डिकंपोझर मिश्रण

४० ग्रॅम वेस्ट डिकंपोझर कल्चर + १० किलो गूळ + १००० लिटर पाणी. सदर वेस्ट डीकंपोझर मिश्रण खालील प्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून पिकाची सूक्ष्म अन्नघटकांची गरज पूर्ण करण्याकरिता वापरता येईल-

अ) जैविक सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण - ५० लिटर जैविक सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाचे द्रावण + १५० लिटर वेस्ट डीकंपोझर मिश्रण याप्रमाणे २०० लिटर द्रावण प्रति एकर जमिनीत ओल असताना, जमिनीवर फवारणी अथवा ठिबकद्वारे देण्यासाठी.

ब) लेंडी खत मिश्रण - २० लिटर बकरी लेंडीखत मिश्रणाचे द्रावण + १८० लिटर वेस्ट डीकंपोझर याप्रमाणे २०० लिटर द्रावण प्रति एकर जमिनीत ओल असताना जमिनीवर फवारणी अथवा ठिबकद्वारे देण्यासाठी.

क) दगडांचे मिश्रण - वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, दगड पाण्यात अथवा वेस्ट डीकंपोझर मिश्रणामध्ये भिजवून, भिजवलेल्या दगडाचे ५० लिटर मिश्र द्रावण + १५० लिटर वेस्ट डीकंपोझर याप्रमाणे जमिनीतील ओल असताना २०० लिटर द्रावण प्रति एकर जमिनीत ओल असताना, जमिनीवर फवारणीसाठी अथवा ठिबकद्वारे देण्यासाठी.

Organic Farming
Organic Farming : शेतीमाल प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती पद्धतीविषयी प्रशिक्षण

१०) जैविक आच्छादन - निंदण करताना संपूर्ण तणांचे अवशेष दोन ओळींमधील जागेत पातळ थरात पसरवून जैविक आच्छादन करणे.

११) सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बीजप्रक्रियेसाठी, सेंद्रिय खताद्वारे जमिनीत देण्यासाठी, फवारणीद्वारे देण्यासाठी, द्रावणाचे ड्रेचिंग करण्यासाठी, ठिबक अथवा स्प्रिंकलरने व्हेंचुरीद्वारे देण्यासाठी सुद्धा करता येतो.

रायझोबिअम कल्चर -

१) बियाणे प्रक्रिया - २५ मिलि प्रति किलो बियाणे

२) ठिबकद्वारे - २ लिटर प्रति एकर व्हेंच्युरीद्वारे.

३) ड्रेचिंग - ५०० मिलि / २०० लिटर पाण्यात / एकर.

४) साध्या फवारणी पंपाचे नोझल काढून अथवा नोझल ढिले करून द्रावणाची चूळ भरावी किंवा नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी.

५) शेणखताद्वारे - २ लिटर + ५० किलो शेणखत जमिनीत ओल असताना पेरणीपूर्वी द्यावे व योग्य प्रकारे जमिनीत मिसळून घ्यावे.

६) उपयोग - दाळवर्गीय पिकांना नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी.

ॲझोटोबॅक्टर कल्चर -

१) बियाणे प्रक्रिया - २५ मिलि प्रति किलो बियाणे.

२) ठिबकद्वारे - २ लिटर प्रति एकर व्हेंचुरीद्वारे

३) ड्रेचिंग - ५०० मिलि / २०० लिटर पाण्यात / एकर

४) साध्या फवारणी पंपाचे नोझल काढून अथवा नोझल ढिले करून द्रावणाचे ड्रेंचिंग करावे किंवा नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी.

५ः शेणखताद्वारे - २ लिटर + ५० किलो शेणखतात योग्य प्रकारे मिसळून, जमिनीत ओल असताना पेरणीपूर्वी द्यावे.

६) उपयोग - दाळवर्गीय पिकांव्यतिरीक्त इतर सर्व पिकांना नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी

पीएसबी कल्चर -

१) बियाणे प्रक्रिया - २५ मिलि प्रति किलो बियाणे.

२) ड्रेचिंग - ५०० मिलि / २०० लिटर पाण्यात / एकर

३) साध्या फवारणी पंपाचे नोझल काढून अथवा नोझल ढिले करून द्रावणाची चूळ भरावी किंवा नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी.

४) ठिबकद्वारे - २ लिटर प्रति एकर व्हेंचुरीद्वारे

५) शेणखताद्वारे - २ लिटर + ५० किलो शेणखत, जमिनीत ओल असताना पेरणीपूर्वी देऊन जमिनीत योग्य प्रकारे मिसळून घ्यावे.

६) उपयोग - सर्व प्रकारच्या पिकांना स्फुरदची उपलब्धता वाढविण्यासाठी.

Organic Farming
Organic Farming: सेंद्रिय शेतीचे घोडे नेमके अडते कुठे?

ट्रायकोडर्मा -

१) बियाणे प्रक्रिया - १० मिलि प्रति किलो बियाणे.

२) जमिनीत देण्यासाठी - १ ते १.५ किलो / लिटर ट्रायकोडर्मा + ५० किलो शेणखत प्रति एकर पेरणीपूर्वी.

३) पुनर्लागवडीसाठी रोप प्रकिया – ५०० मिलि प्रति ५ लिटर पाण्यात या प्रमाणे द्रावणामध्ये रोपांची मुळे भिजवून पुनर्लागवड करावी.

४) उपयोग - मर, मूळकुज, सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी.

स्युडोमोनास -

१) बियाणे प्रक्रिया - १० ग्रॅम अथवा १० मिलि प्रति किलो बियाणे

२) जमिनीत देण्यासाठी - १ ते १.५ किलो/ लिटर स्युडोमोनास+ ५० किलो शेणखत प्रति एकर पेरणीपूर्वी.

३) उपयोग - पानांवरील रोग, मूळकुज, सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी

ट्रॅपद्वारे कीड व्यवस्थापन :-

अ.क्र. --- ट्रॅपचे नांव --- उपयोग

१) फनेल ट्रॅप --- सर्व प्रकारची किडीची फुलपाखरे

२) डेल्टा स्टिकी ट्रॅप --- सर्व प्रकारची किडींची फुलपाखरे

३) वॉटर ट्रॅप --- सर्व प्रकारची पंख वर्गीय कीड

४) फ्लाय ट्रॅप --- सर्व प्रकारच्या माशी वर्गीय किडी

५) लाइट ट्रॅप --- सर्व प्रकारच्या किडींचा फुलपाखरे, माशी वर्गीय किडी व भुंगेरे (बीटल्स).

कामगंध सापळ्यांच्या माध्यमातून ल्युअरद्वारे कीड व्यवस्थापन :-

अ.क्र. --- ल्युअरचे नांव --- उपयोग

१) हेलील्युअर, हेक्झाल्युअर --- हिरवी बोंड अळी व्यवस्थापनासाठी.

२) गॉसील्युअर, पेक्टीनोल्युअर --- गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी.

३) व्हीटाल्युअर --- ठिपक्यांची बोंड अळी व्यवस्थापनासाठी.

४) ल्युसील्युअर --- शेंडा पोखरणारी, फळ पोखरणारी अळी व्यवस्थापनासाठी.

५) बॉम्बॅकोल्युअर --- रेशीम शेतीमधील उपद्रवी अळीच्या व्यवस्थापनासाठी.

६) बोडोल्युअर, बाक्युल्युअर --- फळमाशी व्यवस्थापनासाठी.

७) स्पोडोल्युअर --- तंबाखूची पाने खाणारी अळी व्यवस्थापनासाठी.

जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७, (सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com