Natural farming Agrowon
ताज्या बातम्या

नैसर्गिक शेती काळाची गरज ः अमिताभ कांत

सध्या खते आणि रसायनांच्या वापरामुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती करण्याकडे वळण्याची गरज आहे, असे मत निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केली.

टीम ॲग्रोवन 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः सध्या खते आणि रसायनांच्या वापरामुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती (NAtural Farming) करण्याकडे वळण्याची गरज आहे, असे मत निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी व्यक्त केली.

निती आयोगाच्या (Niti Aayog) वतीने आयोजित करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण शेती या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कांत बोलत होते. भारत सध्या गहू (Wheat Exporter) आणि तांदळाचा मोठा निर्यातदार (Rice Exporter) बनला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल याती शाश्‍वती देणारा शास्त्रीय मार्ग शोधणे खूप महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

रसायने आणि खतांच्या अतिरिक्त वापरामुळे सध्या अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेतीचे महत्त्व लक्षात येते कारण नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त पद्धत आहे. नैसर्गिक शेतीच्या अनेक पद्धती असून त्यांचा वापर करता येईल, असे निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Variety : पडीक जमीन लागवडीयोग्य केल्याने बीजोत्पादन क्षेत्र वाढले

Oxygenated Water : ऑक्सिजनेटेड पाण्याचा पिकांसाठी उपयोग

Ola Dushkal: ओला दुष्काळ जाहीर करा; 'नाहीतर राज्याची परिस्थिती नेपाळसारखी करु': शेतकऱ्याचा सरकारला इशारा

Soil Erosion : पाणलोट क्षेत्रातील धूप नियंत्रण

Solar Village : शेळकेवाडी झाले शंभर टक्के सौरग्राम

SCROLL FOR NEXT