Bio-Diversity Agrowon
ताज्या बातम्या

Bio-Diversity : पठारांवरील जैवविविधता संवर्धनाची गरज’

‘‘स्थानबद्ध वनस्पतींच्या संवर्धनासाठी जुन्नरमधील पठारांचे मूळ अधिवास संरक्षित करणे गरजेचे आहे.

टीम ॲग्रोवन

जुन्नर : ‘‘स्थानबद्ध वनस्पतींच्या संवर्धनासाठी (Plant Protection) जुन्नरमधील पठारांचे मूळ अधिवास संरक्षित करणे गरजेचे आहे. यासाठी वृक्षतोड कमी करणे, पठारावरील गवत न जाळणे, मानवी हस्तक्षेप, चराई खोदकाम, उत्खनन रोखणे गरजेचे असल्याचे वनस्पती संशोधक प्रा. डॉ. सविता व संजयकुमार रहांडगाले (Dr. Savita And Sanjaykumar Randgale) यांनी सांगितले.

सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि ‘भवताल’च्या वतीने आयोजित ‘जाणू या आणि जपू या पठारांचा वारसा आणि जैवविविधता’ या उपक्रमांतर्गत हिवरे पठार (ता. जुन्नर) येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. रहांगडाले यांनी पठारे, पठारांवरील दुर्मिळ गवत, स्थानबद्ध वनस्पती, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व यांची सखोल माहिती दिली.

डॉ. रहांगडाले म्हणाले, ‘‘तालुक्यातील राळेगण, वरसूबाई परिसरातील वनस्पतींचा भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाचे संशोधक डॉ. कोपुला हेमाद्री यांनी १९६० मध्ये केलेल्या अभ्यासात ९०० दुर्मिळ जातींची नोंद केली. तसेच सात नवीन प्रजातींचा शोध लावला होता. या जाती जगाला नवीन होत्या. सध्या ह्या वनस्पती भयग्रस्त झाल्या असून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा समावेश भयग्रस्त प्रजातींच्या गटात करण्यात आला आहे.’’

यावेळी सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे धनंजय कुलकर्णी, राकेश पांडव, राहुल जोशी, सुनील सोनपाटकी, शुभम रोकडे, मानसी सोनपाटकी, भक्ती गांधी, मानसी गांधी, अथर्व पांडव, अजिंक्य पांडव, स्थानिक शेतकरी चिमा जावळे आदी उपस्थित होते.

डॉ. रहांगडाले यांनी या परिसरातून दोन नवीन वनस्पती प्रजाती ‘सिरोपेजीया महाबळी वेरायटी हेमलती’ व ‘लेडीबोरिया जुन्नरेंसीस’ शोधून काढल्या आहेत. भारतासाठी नवीन सहा वनस्पतींची नोंद केलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ

Girna Dam Water Release: गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी पाचवे आवर्तन

Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विमा योजनेचाच आधार

SCROLL FOR NEXT