Vijay Vadettiwar Agrowon
ताज्या बातम्या

Vijay Vadettiwar : ओबीसी समाजबांधवांची देशव्यापी रॅली काढणार

Rahul Gandhi : नागपुरात ही रॅली निघणार असून यात सहभागी होण्याकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Team Agrowon

Nagpur News : देशभरातील ओबीसी प्रवर्गातील समाजबांधवांची रॅली काढण्याचे नियोजन केले जात आहे. नागपुरात ही रॅली निघणार असून यात सहभागी होण्याकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. या रॅलीत देशभरातील ओबीसी समाजाचे आजी-माजी मुख्यमंत्री, नेते यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आलेल्या वडेट्टीवार यांनी प्रेस क्‍लबतर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याऐवजी ते दुसऱ्याला देण्यात यावे, यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पत्र पाठविले होते, या वृत्ताचे त्यांनी खंडन केले.

ते म्हणाले, की आमच्या पक्षात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरील निर्णय सर्व मान्य करतात. परिणामी आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आहे. असे असले तरी आमची ताकद कमी झाली नाही. आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील ६० पैकी ४५ आमदार महविकास आघाडीचे निवडून येतील, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT