Congress Padyatra : काँग्रेस १६ ऑगस्टपासून काढणार राज्यात पदयात्रा

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरू होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही लोकसभेच्या ४८ मतदार संघांत जनजागृती करण्यासाठी आणि भाजपच्या कारभाराचा पोलखोल करण्यासाठी १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान पदयात्रा काढणार आहे.
Congress
CongressAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरू होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही लोकसभेच्या ४८ मतदार संघांत जनजागृती करण्यासाठी आणि भाजपच्या कारभाराचा पोलखोल करण्यासाठी १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान पदयात्रा काढणार आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, की राज्यातील सहा विभागांत पदयात्रा काढण्यात येणार असून, नागपूर विभागातील पदयात्रेचे नेतृत्व मी करणार आहे, अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र विभागात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्‍चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबईत माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.

Congress
Indian Co-operative Congress : सहकार क्षेत्रातील रोखीचे व्यवहार बंद करा ; पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे आवाहन

कोकण विभागात सर्व नेते एकत्र येऊन पदयात्रा काढतील. या पदयात्रेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. ही पदयात्रा झाल्यानंतर बसयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. भाजप सरकारने जनतेला खोटी आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी, कामगार, गरीब, कष्टकरी जनता, तरुणवर्ग, महिलांचे प्रश्‍न आहे.

महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर केंद्र व राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरले आहे. भाजप जाती- धर्मांत भांडणे लावून राजकीय पोळी भाजत आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्या ‘मित्रों’साठी भाजप सरकार काम करत आहे. यात्रेवेळी सभांच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जनतेच्या समोर मांडले जाणार आहेत.

लोकसभा मतदार संघांचा आढावा...

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्त करण्यात आले आहेत. हे निरीक्षक ४८ मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतील, तेथील राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून १५ ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करतील व त्यानंतर या अहवालावर चर्चा केली जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Congress
Congress Maharashtra President : प्रदेशाध्यक्ष हटविण्यासंदर्भातील हालचालींना वेग

राहुल गांधींचे भव्य स्वागत करू

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह संचारलेला आहे. राहुल गांधी यांनी न डगमगता केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. म्हणूनच भाजपने षड्‍यंत्र रचून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला. देशातील हुकूमशाही सरकार विरोधात लढणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा झालेली आहे.

राहुल गांधी यांचा मुंबईत भव्य सत्कार करण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री नसीम खान यांनी यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दिल्लीत चर्चा केली आहे. प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांना सत्काराचे निमंत्रण दिले आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रवक्ते, डॉ. राजू वाघमारे, भरतसिंग आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com