SSVP Agri Clinic and Agri Business Training Centre Agrowon
ताज्या बातम्या

SSVP Agri Clinic : एसएसव्हीपी ॲग्री क्लिनिक आणि बिझिनेस प्रशिक्षण केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल (National Agricultural Science Complex) येथे ‘राष्ट्रीय कृषी उद्योजक पुरस्कार सोहळा’ उत्साही वातावरणात नुकताच पार पडला.

या वेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाचा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार पुण्यातील एसएसव्हीपी ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझिनेस प्रशिक्षण केंद्राला (SSVP Agri Clinic and Agri Business Training Centre) कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव शुभा ठाकूर (Shubha Thakur) यांच्या हस्ते संस्थेचे प्रमुख अवधुत कदम यांना प्रदान करण्यात आला.

याशिवाय या संस्थेच्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या तिन्ही राज्यातील १७ यशस्वी कृषी उद्योजकाना ‘राष्ट्रीय कृषी उद्योजक २०२३’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वेळी कृषी मंत्रालयाचे संचालक साजिथ कुमार कुनहलथ, हैदराबाद मॅनेजचे महानिर्देशक डॉ. पी. चंद्र शेकारा, ‘नाबार्ड’चे पुनर्वित्त विभागाच्या महाव्यवस्थापिका निवेदिता तिवारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक शंतनू पेंडसे, एआयएफ पीएमयूचे वरिष्ठ आयटी सल्लागार मनीष सक्सेना, राष्ट्रीय मधुमाक्षिका बोर्डाचे आयुक्त नवीनकुमार पटले आयुक्त,

कृषी मंत्रालयाच्या विस्तार सुधारणा विभागाचे सहसंचालक बलराम सिंग, मॅनेजच्या ए. सी. अॅण्ड ए.बी.सी.चे मुख्य समन्वयक डॉ. शहाजी फंड, समुन्नतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार आदी उपस्थित होते.

कृषी उद्योजकता विकास क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृषी उद्योजकांना व त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

यंदा पुण्यातील एसएसव्हीपीया ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझिनेस प्रशिक्षण केंद्राला हा पुरस्कार देण्यात आला.

ही संस्था गेली १५ वर्षे ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझिनेस सेंटर्स ए. सी. अॅण्ड ए.बी.सी. ही कृषी मंत्रालयाची योजना राष्ट्रीय स्तरावर यशस्वीरित्या चालवत आहे.

याची दखल घेऊन कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने संस्थेस राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून गौरविण्यात आले.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र धायबर, पदाधिकारी अतुल खुडे, दत्तात्रय जाधव, सतीश किजबिले यांनी पुरस्कार विजेत्या कृषिउद्योजकांचे अभिनंदन केले.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिलेले संस्थेचे राज्यनिहाय पुरस्कार्थी :
महाराष्ट्र : शिवानंद कुमटगी (कृषी सेवा केंद्र, विजापूर), मनोज अभंग (गूळ उद्योग, अहमदनगर), अक्षय मासाळकर (गांडूळखत उत्पादन, पुणे), ओंकार पोरे (कृषी सेवा केंद्र, सातारा).

राजस्थान : कैलाश चौधरी (मत्स्य पालन, जयपूर), प्रशांत बिष्णोई (डेअरी फार्मिंग, श्रीगंगानगर), दीपक कुमार केसवान (कृषी सेवा केंद्र, हनुमानगढ), ममता यादव (डेअरी फार्मिग, जयपूर),

जितेंद्र गोदरा (डेअरी फार्मिंग, गंगानगर), विकास चौधरी (डेअरी फार्मिंग, जयपूर), शिव किशन गुर्जर (सवाई माधवपुर), ओमप्रकाश भादना (कृषी सेवा केंद्र, अलवर).


गुजरात : परेश हदिया (कृषी सेवा केंद्र, अमरेली), यतीन वासोया (कृषी सेवा केंद्र, राजकोट), वघासिया पंकज (कृषी सेवा केंद्र, जुनागढ), सोरथिया हर्षल मुकेशभाई (कृषी सेवा केंद्र,
अमरेली), अनिल त्रांबडिया (गिर गाई गोशाळा, जुनागढ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT