पुणे ः करिअरमधील महत्त्वाच्या तीन पायऱ्यांपैकी माहिती ही पहिली, ज्ञान ही दुसरी आणि कौशल्य ही सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी असून सकाळ व ॲग्रोवन संलग्न एसआयआयएलसीचा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम (Agri Business Management Course of SIILC) विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणारा एक अनोखा अभ्यासक्रम आहे. इतर अभ्यासक्रमांपेक्षा ॲग्रोवनमुळे कृषी क्षेत्रातील उद्योगांचे भक्कम जाळे या अभ्यासक्रमाशी विणले गेले आहे.
त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंडस्ट्रींसोबत संवाद साधता येतो जे करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे व त्यातून विद्यार्थ्यांना जे काही काय करायचं आहे ते आपल्या आवडीनुसार त्यात करिअर घडवू शकतात, हे या अभ्यासक्रमाचे वेगळेपण असल्याचे मत येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर यांनी व्यक्त केले.
एसआयआयएलीच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या ९ व्या बॅचच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी के.बी.एक्सपोर्ट व के.बी.बायोऑरगॅनिक प्रा.लि.चे संचालक सचिन यादव आणि एसआयआयएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निनाद पानसे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. कौसडीकर म्हणाले, की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चार महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. एक म्हणजे दृष्टिकोन, तो जर सकारात्मक असेल तर यशस्वी होण्यास नक्की मदत होते. दुसरी म्हणजे आत्मविश्वास, तो वाढविण्याची गरज आहे. कारण कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
तो नसेल तर मग माहिती, ज्ञान असूनही उपयोग नाही. तिसरे म्हणजे संवाद, योग्य संवाद कौशल्य नसेल तर यशस्वी होण्यात अडचणी येतात. चौथे म्हणजे शिस्त, प्रत्येकाने आयुष्यात स्वतःला शिस्त लावली पाहिजे. कम्फर्ट झोनमधून बाहेर येणे महत्त्वाचे आहे. प्रशासन आणि व्यवस्थापन या दोन्ही वेगवेगळ्या बाबी असून जे काही करायचं आहे ते आवडीने करणे महत्त्वाचे आहे.
डेटा ॲनॅलिसिस अभ्यासक्रमात महत्त्वाचे
इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांपेक्षा कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान असूनही स्वतःचे सादरीकरण करता येत नाही. प्रभावी सादरीकरण, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व इ.चा अभाव त्यांच्यात जाणवतो. परंतु एक्स्पोर्ट इंडस्ट्रीत करिअर करायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये याबाबत साक्षरता येणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी निर्यातीतील योग्य माहिती व ज्ञान घेण्याची गरज आहे.
- सचिन यादव, संचालक, के. बी. एक्स्पोर्ट,फलटण
एसआयआयएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पानसे म्हणाले, आपण काय शिकतो आणि आपण काय बनतो याविषयी विचार करण्याची गरज आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात उद्योजक मानसिकता, क्रिएटिव्हिटी, डिझाईन थिंकिंग, आपण इंडस्ट्रींसोबत काम करताना आपल्या ज्ञानाचे योगदान कसे देऊ शकतो याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी २०१८-१९ वर्षाच्या बॅचचा पोल्ट्री उद्योजक बनलेला विद्यार्थी प्रसाद सातपुते याने स्वतःचा अनुभवात पोल्ट्री उद्योगातून वर्षाला ६० लाख अंड्यांचे उत्पादन घेत असल्याचे सांगितले. ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमात मिळालेले रूरल मार्केटिंगचे धडे या उद्योगात यशस्वी होण्यास खूप कामी येत असल्याचे तो म्हणाला.
एसआयआयएलसीचे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी प्रास्ताविक, शिक्षण विभाग प्रमुख डॉ मंजूषा मोरे यांनी स्वागत तर बिझनेस हेड स्वप्नील नाईक यांनी आभार व्यक्त केले. रोहित राऊत व चंद्रशेखर पोटे यांनी सहकार्य केले. अभ्यासक्रमात कोणत्याही शाखेचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. ३१ ऑक्टोबरपासून कोर्स सुरू होत आहे. कोर्सविषयी अधिक माहितीसाठी संपर्कः ९८८१०९९४२६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.