Jivant Satbara Campaign Phase 2 Begins Today: जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला. बारामती तहसील कार्यालयामार्फत २६ डिसेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान जिवंत सातबारा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले आहे. या कालावधीत तुम्हाला सातबाऱ्यावर दुरुस्त्या करता येतील..या मोहिमेअंतर्गत जमिनीच्या नोंदी अचूक आणि ७/१२ अद्ययावत करता येईल. तसेच कालबाह्य झालेल्या नोंदी कमी करणे, इतर हक्कातील महिला वारस नोंदी कब्जेदार सदरी घेणे. रहिवास विभागातील तुकडेबंदीचे व्यवहार विनामुल्य नियमित करणे आणि लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करता येईल. ही सर्व कामे विनामुल्य केली जाणार आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे..Satbara: तुकडेबंदी शिथिल, 'सातबारा'वर आता स्वतंत्र नाव.त्यासाठी नागरिकांनी याबाबतच्या अर्जासोबत सातबारा आणि फेरफार केल्यास त्याच्या नोंदी जोडायला हव्यात. या दुरुस्त्यांसाठी महसूल मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा केल्यानंतर २६ जानेवारीपूर्वी नोंदी नियमितीकरण केल्या जातील. .Satbara Utara: ७/१२ शब्दाचा अर्थ काय?.मूळ मालकाच्या मृत्यूनंतर सातबाऱ्यावर वारसांची नावे नोंदवण्याच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यासाठी जिवंत सातबारा मोहीम राबवली जात आहे. .Satbara Records: सातबारामधील विविध नोंदींचे महत्त्व.सातबाऱ्यावर मृत खातेदारांची नोंद असल्याने शेतकऱ्यांना जमिनीच्या व्यवहाराबाबत तसेच कर्ज प्रकरणे आणि कायदेशीर बाबींच्या प्रक्रियेदरम्यान अडचणी येऊ शकतात. यामुळे राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम सुरु केली आहे. .राज्य सरकारकडून 'जिवंत सातबारा मोहीम' राबविण्याबाबत १९ मार्च रोजी अध्यादेश जारी करण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीच्या तहसीलदारांनी चिखली तालुक्यात याबाबत एक मोहीम राबवली होती. या तालुक्यातील १५९ गावांत ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली होती. त्यानंतर ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.