Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे; मुख्यमंत्री नायडू यांची केंद्र सरकारकडे मागणी
Indian Agriculture: मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी (ता.२५) केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची अमरावती येथील मुख्यमंत्र्यांच्या कॅम्प कार्यालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संस्थात्मक क्षमता मजबूत करण्यासाठी विविध मागण्या मुख्यमंत्री नायडू यांनी केल्या आहेत.