Nana Patole  Agrowon
ताज्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा ः पटोले

Latest Political News : राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून, भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरू आहे.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून, भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरू आहे.

राज्यात ‘अलिबाबा ४० चोर’ अशी परिस्थिती असून, जनतेची तिजोरी लुटली जात आहे. त्यामुळे राज्यपाल व राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करून राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (ता. १३) केली.

पटोले म्हणाले, ‘‘राज्यात सध्या तमाशा सुरू आहे. हे पाप भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक करत आहे. भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्‍न पडला आहे. राज्यात सध्या जे सुरू आहे ते भूषणावह नाही.

राज्यातील सरकार अस्थिर असून हे सरकार कधी जाईल, हे सांगता येत नाही. मलईदार खाती कोणाला मिळावीत यासाठी मारामारी सुरू आहे. कोणाला कोणते खाते मिळावे यात राज्यातील जनतेला स्वारस्य नाही. केंद्रातील भाजप सरकार ईडी, सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे.’’

‘सरकारने जनतेला सोडले वाऱ्यावर’

‘‘राज्यातील काही भागांत अजून पेरण्या झालेल्या नाहीत. तर काही भागांत दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करूनही ती मिळालेली नाही. कृषिमंत्री बोगस पथक पाठवून लुटण्याचे काम करत आहेत.

शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, जनतेच्या प्रश्‍नावर सत्ताधारी पक्ष बोलत नाहीत. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रशअनावर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारेल,’’ असे पटोले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT