Nana Patole  Agrowon
ताज्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण ः पटोले

Ajit Pawar News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपचा ‘विकृत पॅटर्न’ आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पाहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे.

लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भाजपने तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,’’ असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

पटोले म्हणाले, ‘‘भाजपचा जनाधार घटत आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्येही भाजपचा दारुण पराभव होत असल्याचे चित्र आहे. देशात व केंद्रातही परिवर्तन करण्याचा जनतेचा इरादा दिसत आहे.

महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याचे दिसत असल्याने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. आगामी निवडणुकीत लाज राखण्यासाठी फोडीफोडीशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याच मानसिकतेतून हा सत्तापिपासू उद्योग केला.’’

‘‘उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना आणला होता. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याच्या वल्गनाही ते करत असतात.

आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच ‘राष्ट्रवादी’च्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. परवाच पंतप्रधानांनी ‘राष्ट्रवादी’वर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता भाजप, नरेंद्र मोदी व फडणवीस कोणत्या तोंडाने ‘राष्ट्रवादी’च्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत, याचे उत्तरही जनतेला द्यावे लागेल,’’ अशी कठोर टीका पटोले यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT