Horticulture Development Mission Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Fruit Crop Cultivation : फळपीक लागवडीत नागपूरची आघाडी

Horticulture Scheme : फळबाग लागवड योजनेत नागपूर विभागाने राज्यात आघाडी घेतली आहे.

Team Agrowon

Nagpur News : फळबाग लागवड योजनेत नागपूर विभागाने राज्यात आघाडी घेतली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवडीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद असून या माध्यमातून गेल्या एका वर्षात ५५५८ हेक्‍टर क्षेत्र फळपिकांखाली आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी दिली.

ऑरेंज सिटी अशी नागपूरची ओळख आहे, मात्र विदर्भातील एकूण एक लाख हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ २५ हजार हेक्‍टरवर नागपूर भागात संत्रा लागवड आहे. उर्वरित ७५ हजार हेक्‍टर लागवड ही अमरावती जिल्ह्यात आहे. त्यावरून मुळातच लिंबूवर्गीय फळपिकांखालील क्षेत्र नागपूर जिल्हा आणि विभागात कमी आहे.

आता कृषी विभागाकडून फळपीक लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात एका वर्षात तब्बल ५५५८ हेक्‍टरवर फळपिकांची लागवड झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३५०० हेक्‍टर आंबा, काजू १२५, सीताफळ १४०, मोसंबी ४४०, कागदी लिंबू ३५०, संत्रा ६५०, फणस २५० हेक्‍टर याप्रमाणे समावेश आहे

राज्यात ५५५८ हेक्‍टर इतके क्षेत्र एकाच वर्षात मनरेगांतर्गंत फळपिकाखाली आणून नागपूर विभागाने राज्यात आघाडी घेतली आहे. फळपिकांच्या जोडीला फुलशेतीलाही पसंती मिळाली असून विभागात १७८ हेक्‍टरवर फुलांची लागवड झाली आहे. गुलाब, लिली, अस्टर, ग्लाडीओस या फुलांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, मौदा, काटोल, सावनेर या भागात फुलांची लागवड मुख्यत्वे झाली आहे, असे साबळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; सोमवारपासून विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Jowar Procurement : अमरावतीत ज्वारीची खरेदी होणार

Non Cognizable Offence: आमदार संजय गायकवाड यांच्यावर मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

Crop Insurance Payout : पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांना ५५ कोटींचे पीकविमा भरपाई

POCRA Scam : पोकरातील गैरप्रकारप्रकरणी अहवालानंतर कारवाई

SCROLL FOR NEXT